१०५ कोटींच्या रिंगरूटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण; भूमिपूजनाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:02 AM2019-09-14T00:02:18+5:302019-09-14T00:02:25+5:30

उल्हास नदीवरही नव्या पुलाची उभारणी

Concretization of 2 crore ringgit road; Landfall | १०५ कोटींच्या रिंगरूटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण; भूमिपूजनाचा धडाका

१०५ कोटींच्या रिंगरूटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण; भूमिपूजनाचा धडाका

Next

बदलापूर : बदलापूर आणि ग्रामीण भागातील विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी झाले. त्यातील बदलापूरमधील महत्त्वाचा रस्ता असलेल्या जान्हवी लॉन ते शिरगाव या १०५ कोटींच्या रिंगरूट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. सोबत, उल्हास नदीवरील नव्या पुलाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

बदलापूरमधील विविध ठिकाणच्या २९ रस्त्यांचे आणि बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवर आठ कोटी रु पये खर्चाच्या नवीन पुलाचे भूमिपूजन खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. एमएमआरडीएच्या माध्यमातून बदलापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. जुना कात्रप पेट्रोलपंप ते खरवई या १०५ कोटी रुपयांच्या बाह्यवळण रस्त्याचे आणि योगेश्वर हॉटेल ते मोहन हायलॅण्डकडे जाणाºया पाच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन आणि अन्य रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

एमएमआरडीएच्या माध्यमातून बदलापूरमध्ये विविध विकासकामे झाली आहेत. यामुळे बदलापूरसह मुरबाडमध्ये रस्ते काँक्रिटचे करण्यात येणार असून मतदारसंघात एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही कथोरे यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष प्रियेश जाधव, शहरप्रमुख वामन म्हात्रे, उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे, शहरप्रमुख वामन म्हात्रे, नगरसेवक शरद तेली, श्रीधर पाटील, प्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

मेट्रोच्या कामालाही मिळणार गती
आमदार किसन कथोरे यांनी भूमिपूजनानंतर मेट्रोच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. बदलापूर मेट्रो थेट मुंबई वेस्टर्नला जोडण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. या मेट्रोचा डीपीआर तयार झाल्यावर त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे कथोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Concretization of 2 crore ringgit road; Landfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.