उल्हासनगर डंपिंग ग्राउंड हटाव उपोषणाची सांगता, आयुक्तांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:29 PM2020-09-04T15:29:52+5:302020-09-04T15:30:25+5:30

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डंपिंग ग्राउंडमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या निषेधार्थ भाजपचे नगरसेवक शेरी लुंड, राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सतरामदास जेसवानी, अमर लुंड आदींनी ३ सप्टेंबर रोजी उपोषण सुरू केले

Conclusion of Ulhasnagar dumping ground removal fast, assurance of Commissioner | उल्हासनगर डंपिंग ग्राउंड हटाव उपोषणाची सांगता, आयुक्तांचे आश्वासन

उल्हासनगर डंपिंग ग्राउंड हटाव उपोषणाची सांगता, आयुक्तांचे आश्वासन

googlenewsNext

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर भाजपा नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे सतरामदास जेसावाणी यांनी डंपिंग ग्राउंड हटाव आंदोलन मागे घेतले. कचऱ्याचे वर्गीकरण, मृत जनावरांची विल्हेवाट, पर्यायी डंपिंग ची व्यवस्था आदी आश्वासन दिलें आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डंपिंग ग्राउंडमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या निषेधार्थ भाजपचे नगरसेवक शेरी लुंड, राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सतरामदास जेसवानी, अमर लुंड आदींनी ३ सप्टेंबर रोजी उपोषण सुरू केले. उपोषणाला बहुतांश भाजप नगरसेवकांसह आमदार कुमार आयालानी यांनी पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी यांनी आमदार कुमार आयालानी यांच्या पाठींबा ची दखल घेवून तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. नगरसेवक सत रामदास जेसावानी यांनी मुंडण करून उपोषणाला सुरवात केली. माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्थी केल्यावर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी दुर्गंधी येत असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर रासायनीक द्रवाची फवारणी, मृत जनावरांची वेगळी विल्हेवाट लावणे, ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण तसेच डंपिंग ग्राउंड साठी पर्यायी जागा शोधणे आदी आश्वासन आयुक्तांनी लेखी दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले आहे. 

महापालिकेकडे डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसल्याने, महापालिकेने उसाटणे गाव शेजारील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा मागितली आहे. शासनाने जागा देण्याला तात्विक मंजुरी दिली असलीतरी, अद्यापही जागा महापालिकेकडे विनामूल्य हस्तांतरित झाली नाही. खडी मशीन येथिल डंपिंग ग्राउंड फ्लोअरफ्लो झाल्यानंतर शहरातील कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न महापालिका समोर उभा ठाकला आहे. जुने राणा खदान डंपिंग ग्राउंड वरील कचऱ्यावर कोट्यवधी निधीतून प्रक्रिया करण्यात येत असून डंपिंग शेजारील अवैध अतिक्रमण हटविल्यास २ एकरचा भूखंड महापालिकेला उपलब्ध होऊ शकतो. अशी चर्चा शहरात सुरू आहे. जुने डंपिंग व नवीन जागेचा वापर डंपिंग ग्राउंड साठी होऊ शकतो. 

महापालिका प्रशासनाने ठरले वरचढ

भाजपा नगरसेवकांसह अन्य पक्षाच्या नगरसेवकांनी डंपिंग ग्राउंड हटावची मागणी करीत ३ सप्टेंबर रोजी उपोषण सुरू केले. उपोषणाला सूरवात करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नगरसेवकांची मनधरणी करून काही आश्वासन दिले होते. तेच आश्वासन उपोषण वेळी देवून उपोषणाची सांगता केल्याने पालिका प्रशासन वरचड ठरल्याचे बोलले जात आहे

Web Title: Conclusion of Ulhasnagar dumping ground removal fast, assurance of Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.