उल्हासनगर महापालिका परिवहन बसमध्ये महिला, वृद्ध आणि दिव्यांगाना मिळणार सवलत
By सदानंद नाईक | Updated: March 5, 2025 18:02 IST2025-03-05T18:01:22+5:302025-03-05T18:02:10+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी परिवहन विभागाची बैठक घेऊन महिला, वृद्ध व दिव्यांगाना तिकीट व पास सवलतीसाठी प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले. तसेच बस निवारे, प्रवास निवारे बांधताना विरोध करणाऱ्यावरही कारवाईचे संकेत आयुक्तानी दिले.

उल्हासनगर महापालिका परिवहन बसमध्ये महिला, वृद्ध आणि दिव्यांगाना मिळणार सवलत
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी परिवहन विभागाची बैठक घेऊन महिला, वृद्ध व दिव्यांगाना तिकीट व पास सवलतीसाठी प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले. तसेच बस निवारे, प्रवास निवारे बांधताना विरोध करणाऱ्यावरही कारवाईचे संकेत आयुक्तानी दिले.
उल्हासनगर महापालिकेने शहर अंतर्गत व शेजारी शहरासाठी परिवहन बस सेवा सूरू केली. या बस सेवेचा दिव्यांग, महिला व वृद्धाना तिकीट व पास मध्ये सवलत मिळावी. यासाठी तत्काळ प्रस्ताव आणण्याचे आदेश मंगळवारी घेतलेल्या विभागाच्या बैठकीत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले. तसेच शहरांत नियमितपणे प्रवासी व बस निवारे उभारताना विरोध होत असेलतर त्यावर कारवाईचे आदेश आयुक्तानी दिले. तिकीट तपासणी यावर आयुक्तानी जोर देऊन बस निवाऱ्यावर महापालिका विकास कामाच्या जनजागृतीसाठी जाहिराती लावण्याचे आदेश दिले.
शहरात विविध विकास कामामुळे रस्ते खोदण्यात आल्याने, एसी बस शहाड फाटक ते टिटवाळा दरम्यान चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बैठकीला परिवहन बस विभागाचे विनोद केणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी महिला, वृद्ध व दिव्यांग आदिना तिकीट व पास मध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव मागितल्याने, लवकरच बस मध्ये महिला, वृद्ध व दिव्यांगाना सवलत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.