शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

ठाण्यामध्ये यंदा पुन्हा ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ संकल्पना

By admin | Updated: March 26, 2017 04:30 IST

अत्यल्प प्रतिसादामुळे फसलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना यंदा पुन्हा गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत राबवली

ठाणे : अत्यल्प प्रतिसादामुळे फसलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना यंदा पुन्हा गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत राबवली जाणार आहे. यंदा ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आयोजक कसोशीने प्रयत्न करीत आहेत.‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेत तरुणांचा सहभाग मोठ्या संख्येने असावा, यासाठी ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही स्पर्धा झाली. स्वागतयात्रेच्या निमित्ताने राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्याचा समावेश होता. मात्र, स्पर्धेची संकल्पना अनेकांपर्यंत न पोहोचल्याने व काहींपर्यंत ती पोहोचूनही स्पष्ट न झाल्याने केवळ सात स्पर्धकांचे ३१ सेल्फी प्राप्त झाले होते. त्यामुळे सात स्पर्धकांपैकी पाच जणांना बक्षीस कसे द्यायचे, असा सवाल परीक्षकांना पडला होता. यंदा ही स्पर्धा यशस्वीपणे राबवण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न आहेत. या स्पर्धेच्या तांत्रिक बाबी स्पष्ट झाल्यास स्पर्धेत सहभाग घेता येईल, असे तरुणांनी सांगितले. ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आणि ‘फोटो सर्कल सोसायटी’ यांच्या वतीने स्वागतयात्रेच्या छायाचित्रणाची स्पर्धा होणार आहे. यात ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा २०१७’ तसेच ‘नववर्ष स्वागतयात्रा छायाचित्र स्पर्धा २०१७’ अशा दोन स्पर्धा होतील. या दोन्ही स्पर्धांत फक्त ठाणे महापालिका हद्दीत होणाऱ्या स्वागतयात्रांमधील छायाचित्रेच स्वीकारली जातील. ‘नववर्ष स्वागतयात्रा छायाचित्र स्पर्धा २०१७’ यासाठीची छायाचित्रे ८ इंच बाय १२ इंच आकारात असावी आणि ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ या स्पर्धेसाठी २ी’ा्री८ं३१ं@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर छायाचित्र पाठवण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत काढण्यात आलेली छायाचित्रे १ व २ एप्रिल या दोन दिवशी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ठामपा क्र. १९ समोर, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे येथे स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)