शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

संगणक शिक्षण बंद, भाईंदर पालिकेचा कारभार : तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 03:56 IST

शिक्षण विभागाने २००६ मध्ये पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेने प्रत्येक शाळेसाठी सुरुवातीला सुमारे तीन ते चार संगणक खरेदी केले.

राजू काळे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सध्या ३६ शाळा असून त्यात विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणासाठी १० वर्षांपूर्वी सुमारे १५० हून अधिक संगणक बसवण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्र लॅबही सुरू करण्यात आली. मात्र तीन वर्षांपासून त्या लॅबचे कंत्राट संपुष्टात आल्याने बंद आहेत. त्यासाठी अद्याप ठोस प्रयत्न न झाल्याने विद्यार्थी संगणकाच्या शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत.

शिक्षण विभागाने २००६ मध्ये पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेने प्रत्येक शाळेसाठी सुरुवातीला सुमारे तीन ते चार संगणक खरेदी केले. मात्र, विद्यार्थ्यांची एका वर्गातील पटसंख्या पाहता तसेच शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात ३५ लाखांचीच वार्षिक तरतूद असताना सर्व शाळांमध्ये पुरेसे संगणक एकाचवेळी खरेदी करणे अशक्य ठरले. त्यामुळे पालिकेने कंत्राटदारामार्फत संगणकपुरवठा व प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेसर्स पॅम्से टेक्नॉलॉजी या कंपनीला २००६ मध्येच १० वर्षांचे कंत्राट दिले.पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना सरकारी सेवा नियमातील अटी व शर्तीनुसार एमएससीआयटी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे फर्मान प्रशासनाने काढले. काही शिक्षकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असतानाही त्यांना त्या खाजगी कंपनीच्या संगणक प्रशिक्षकाकडून संगणकाचे ज्ञान मिळवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. परंतु, त्याकडे शिक्षकांनी पाठ दाखवल्याने केवळ खाजगी प्रशिक्षकावर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची मदार अवलंबून राहिली. त्यासाठी प्रत्येक शाळेत लाखो रुपये खर्चून एका खोलीत कॉम्प्युटर लॅब तयार करण्यात आली. प्रशिक्षणाला सुरुवात होताच विद्यार्थ्यांना विविध सॉफ्टवेअरची माहिती, अक्षरांची ओळख, चित्रकला, त्यातील रंगरंगोटीचे शिक्षण मिळू लागले.

सुरुवातीला प्रशिक्षण चांगले सुरू होते. त्यानंतर प्रशिक्षकांची सतत बदली होऊ लागल्याने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर परिणाम होऊ लागला. त्यातच कंपनीच्या कंत्राटाची मुदत २०१६ मध्ये संपुष्टात आली. तत्पूर्वी कंत्राटाची मुदत वाढवण्यासाठी कंपनीने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणाची निकड लक्षात घेता त्या कंत्राटाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली. कंत्राट नूतनीकरणाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर कंपनीला कार्यादेश देण्यास टाळाटाळ होऊ लागली. मुदत संपल्यानंतर कार्यादेशाची वाट न पाहता कंपनीने काही दिवस विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणे सुरूच ठेवले. अखेर कार्यादेश मिळण्याचा मार्ग खडतर होऊ लागल्याचे लक्षात येताच कंपनीने कंत्राटावरील संगणक प्रशिक्षणाचा गाशा गुंडाळला. कंपनीने ३५ शाळांत बसवलेले १०० हून अधिक संगणक काढून नेले. यामुळे विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण तीन वर्षापासून बंद पडले.पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या संगणक प्र्रशिक्षणासाठी कंत्राटदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांचे बंद पडलेले संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.- ज्योत्स्ना हसनाळे, सभापती, शिक्षण समिती) 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbaiमुंबई