शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ठाण्यात घुमला शाहिरांचा आवाज, शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 4:16 PM

शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न झाला. यावेळी ठाण्यात तमाम शाहीरांचा आवाज घुमला.

ठळक मुद्देठाण्यात घुमला शाहिरांचा आवाजशाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न या महोत्सवात शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्ये व कोळीनृत्य

ठाणे: कला, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रांत लोकप्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान व शिवसेना सावरकर नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्याच्या सावरकर नगर येथील शाळा क्र. १२० च्या मैदानाता ‘शाहिरी लोककला महोत्सव २०१९’ हा रसिकांच्या तुफान गर्दीत, तरुणाईच्या जल्लोषात आणि टाळ््या- शिट्ट्यांच्या आवाजात संपन्न झाला. धमर्वीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त या महासोहळ््याचे आयोजन केले होते.        या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्ये व कोळीनृत्यांनी ठाणेकर रसिकांची मने जिंकली. नृत्यांगना पौर्णिमा सुयर्वंशी, विनोदवीर विकास थोरात, विनोदवीर डॉ. प्रमोद नलावडे, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, अभिनेत्री माधवी जुवेकर, नमनकार अशोक दुदम, अभिनेते विजय कदम, नृत्यांगना श्रीकला हट्टंगडी, महिला शाहीर धनश्री पवार, अभिनेते सुनील गोडसे, कॅसेटकिंग छगन चौगुले आणि इतर नामवंत कलाकारांच्या सहभागाने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्यावतीने ११ मान्यवरांना लोकगौैरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या सोहळ््यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी महापौर प्रेमसिंग रजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण व इतर उपस्थित होते. महोत्सवाचे संकल्पना व दिग्दर्शन विनोद नाखवा यांचे तर महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अद्यक्ष मधुसुदन सुगदरे व अध्यक्ष रमेश नाखवा यांचे होते.लोककलेच्या दिंडीने सुरू झालेला हा महोत्सव लोककलेच्या विविध सादरीकरणांनी पार पडला. गणेश वंदना झाल्यावर शाहिर शांताराम चव्हाण यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताला, शाहीर अर्जुन अटाळीकर यांच्या नारीला द्या सन्मान या लोकगीताला व शाहीर रमेश नाखवांच्या एकविरा देवीच्या गीताला रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत मराठी पाऊल पडते पुढे या नृत्यमय गीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाहीर दत्ता ठुले यांच्या आदिवासी लोकगीताने आणि शाहीर निलेश जाधव यांच्या संभाजी महाराजांवरील पोवाड्याने रसिकांना ताल धरायला लावला तर राजेश सुतार यांनी आई तुझं देऊळ हे गीत सादर केले. महिला शाहिर धनश्री पवार हिने शिवाजी महाराजांवरील सादर केलेला पोवाडा रसिकांच्या हृदयाला भिडला तर लोककलावंत छगन चौगुले यांनी आपले नवरी नटली हे स्वत:चे गाजलेले लोकगीत सादर केले व रसिकांना ठेका धरायला लावला. विनोद नाखवा यांच्या संकल्पनेतून साकारलेले मी हाय कोळी हे नृत्य म्हणजे या कार्यक्रमाचा कळस ठरला. त्याचप्रमाणे शेतकरी गीत, आम्ही ठाकर, कैरी पाडाची ही इत्यादी नृत्यमय गीतांना रसिकांनी टाळ््यांचा व शिट्ट्यांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिक