शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पैसे आकारले; भाजपाच्या नगरसेवकांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या रुग्णांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या जाहीर करावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या योजनेतून हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्या अनेक लाभार्थी रुग्णांकडून हॉस्पीटलने जादा पैसे आकारल्याच्याही घटना घडल्या आहेत, याकडेही डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.

महात्मा ज्योतिबा  फुले जन आरोग्य योजनेतून कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेला मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत संबंधित योजनेचा तळागाळातील तसेंच सामान्य परिस्थितीतील रुग्णांना फायदा होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

या योजनेतून सध्या केवळ गंभीर स्थितीतील रुग्णांवरच मोफत उपचार केले जातात. काही वेळा या रुग्णांनाच काही रक्कम रुग्णालयात भरण्यास सांगितली जात आहे. ठाणे शहरातील काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखलच केले जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत त्रूटी असल्याबरोबरच रुग्णालय प्रशासन मुजोर असल्याचे उघड होत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ठाणे शहरातील अशा किती रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. किती रुग्णांना हॉस्पीटलला जादा रक्कम अदा करावी लागली, याची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी नगरसेवक डुंबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका