शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालय, आरोग्य केंद्रात तक्रार पुस्तिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:36 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवासुविधांमध्ये असलेल्या त्रुटी, होणारा हलगर्जीपणा आदींना वचक बसवण्यासाठी प्रशासनाने उशिराने का होईना नागरिकांसाठी तक्रार पुस्तिका ठेवल्या आहेत.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवासुविधांमध्ये असलेल्या त्रुटी, होणारा हलगर्जीपणा आदींना वचक बसवण्यासाठी प्रशासनाने उशिराने का होईना नागरिकांसाठी तक्रार पुस्तिका ठेवल्या आहेत. रुग्ण व नागरिकांच्या तक्रारींवर दोन आठवड्यांत केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराच्या घरपोच केली जाणार आहे.मीरा-भाईंदर महापालिकेची ९ आरोग्य केंद्र तर २ उपकेंद्र आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना सर्वसाधारण आजार, लसीकरण आदी सुविधा माफक दरात मिळत असल्याने तेथे नागरिकांची नेहमीच गर्दी असते. तर पालिकेच्या मीरा रोड येथील इंदिरा गांधी व भार्इंदर येथील भीमसेन जोशी रुग्णालयात देखील ओपीडीत रांगा लागलेल्या असतात.तसे असले तरी रुग्णालयातील ओपीडी खासगी डॉक्टर चालवत असल्याने तपासणीसाठी येणा-या रुग्णांना काही जण थेट आपल्या रुग्णालयात उपचारासाठी पाचारण करतात. शिवाय रुग्णालय केवळ नावा पुरतेच असून तेथे गंभीर आजार, अकस्मात अपघात वा अन्य कारणांनी येणा-या रुग्णांना मात्र रुग्णालयात तातडीची आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. अनेक वेळा तर पालिकेच्या रुग्णालयातील हलगर्जीपणा रुग्णांच्या जिवावर बेतला असून, पालिकेचे रुग्णालय तर नेहमीच वादग्रस्त ठरलं आहे. त्यातच येणारे रुग्ण वा त्यांचे नातेवाईकांना उपचार व वैद्यकीय सुविधेबद्दल वाईट अनुभव आले तरी तेथे कोणी दाद देत नव्हते.अखेर या प्रकरणी कृष्णा गुप्ता ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्या सत्यकाम फाऊंडेशनमार्फत रुग्णालयात तक्रारनोंद वही ठेवण्याची मागणी गेल्या वर्षापासून लावून धरली. पालिकेने देखील वेळकाढूपणा करत का होईना अखेर प्रशासनाला जाग आली व सर्व आरोग्य केंद्र, रुग्णालयांमध्ये पिवळ्या रंगाची तक्रार नोंद पुस्तिका ठेवण्यात आली आहे. सदर नोंदवहीत तक्रारदाराने आपली माहिती देतानाच तक्रारीचे स्वरुप तसेच उपलब्ध असले तर साक्षीदार यांची माहिती द्यायची आहे. सदर तक्रार पुस्तिकेवरून आवश्यक कार्यवाही केली जाणार असून दोन आठवड्यात कार्यवाहीची माहिती लेखी स्वरुपात तक्रारदाराने दिलेल्या पत्त्यावर पोच केली जाणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या तक्रार पुस्तिकेचा वापर करून आपल्या समस्या, गैरसोयी, हलगर्जीपणा आदींची नोंद करावी. जेणेकरून रुग्णालय व आरोग्य केंद्रांच्या सेवेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा कृष्णा गुप्ता याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMira Bhayanderमीरा-भाईंदर