हुंडाबहाद्दरा विरोधात तक्रार
By Admin | Updated: April 25, 2017 23:58 IST2017-04-25T23:58:03+5:302017-04-25T23:58:03+5:30
तालुक्यातील पडघ्याजवळील कळंबोली गावात मुलीच्या घरी साखरपुडा झाल्यानंतर मुलीला भेटून १० तोळ्यांचे गंठण आणि पाच लाख

हुंडाबहाद्दरा विरोधात तक्रार
भिवंडी : तालुक्यातील पडघ्याजवळील कळंबोली गावात मुलीच्या घरी साखरपुडा झाल्यानंतर मुलीला भेटून १० तोळ्यांचे गंठण आणि पाच लाख रोख हुंडा मागितल्याने मुलीने पडघा पोलीस स्टेशनमध्ये नवऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्र ार दाखल केली आहे.
कळंबोली गावातील शेतकरी तसेच प्लम्बिंगचे काम करणाऱ्या अशोक ठाकरे यांची मुलगी ललिताचे लग्न शहापूर तालुक्यातील लेनाड बुद्रुक या गावातील भास्कर शिवराम वेखंडे यांचा मुलगा किशोर याच्याबरोबर जमले होते. १२ मार्च रोजी त्यांचा साखरपुडा होऊन १ मे रोजी लग्न करण्याचे ठरले होते. दरम्यान, महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या ललिता हिला मुंबईस बोलवून लग्नात १० तोळ्यांचे गंठण व पाच लाख रोख हुंडा म्हणून दिले, तरच आपण लग्नास तयार असल्याचे सांगितले. आपल्या कुटुंबाची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर मुलीने तक्रार दाखल केली. (वार्ताहर)