शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या जमिनीवर दारूचे दुकान, मोर्वा येथील राधाकृष्ण मंदिराच्या ट्रस्टींची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:51 IST

मीरा रोड : भार्इंदरच्या मोर्वा गावातील राधाकृष्ण मंदिर देवस्थानच्या जागेवर स्थानिक गावपंच मंडळाच्या अध्यक्षानेच अतिक्रमण करून दारूच्या दुकानासह अन्य ...

मीरा रोड : भार्इंदरच्या मोर्वा गावातील राधाकृष्ण मंदिर देवस्थानच्या जागेवर स्थानिक गावपंच मंडळाच्या अध्यक्षानेच अतिक्रमण करून दारूच्या दुकानासह अन्य बेकायदा बांधकामे केल्याची तक्रार ट्रस्टींनी महापालिकेकडे केली आहे. देवस्थानच्या जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून त्यामुळे गावात नव्या वादाला तोंड फुटले आहे.मोर्वा गावातील श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थानची सर्व्हे क्र. ५९ ही जमीन आहे. त्यापैकी ७३० वार जमीन १९९० साली गौरूबाई पाटील व इतरांना बदली व्यवहाराने द्यायची व त्या बदल्यात मंदिराजवळील पाटील यांची तेवढीच जमीन देवस्थानला हस्तांतरित करायची, असे ठरले होते. त्यावेळी सदर व्यवहार नोंदणीकृत केला नव्हता. गावातीलच गावपंच मंडळाचे अध्यक्ष आणि मंडप डेकोरेटर व्यावसायिक जगदेव म्हात्रे यांनी गौरूबाई व कुटुंबीयांशी परस्पर व्यवहार करून देवस्थानच्या मालकीच्या जागेत १४ खोल्या, मोबाइल टॉवर व बीअर शॉप उभारले. देवस्थानची जागा असताना २००५ पासून या बांधकामांची करआकारणी म्हात्रे यांनी स्वत:च्या नावाने करून घेतली. गौरूबाई व इतरांच्या मालकीची मंदिराजवळची जागा देवस्थानला देणे अपेक्षित असताना, त्या कुटुंबाने म्हात्रे यांना जागा विकली. तसा करारनामा २०१६ साली करण्यात आला. ही बाब ट्रस्टींना कळल्यानंतर त्यांनी म्हात्रे यांना जागा देवस्थानच्या नावे करून देण्यास तगादा लावला. पण, जमीन बदली व्यवहारासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी आणा. मी जमीन देवस्थानच्या नावावर करायला तयार असल्याचे म्हात्रे यांनी कळवले. ट्रस्टने याप्रकरणी पालिकेकडे तक्रार करून म्हात्रे यांनी देवस्थानच्या जागेत बेकायदा १४ खोल्यांचे बांधकाम केले असून त्यात बीअर शॉप व मोबाइल टॉवरचा समावेश असल्याने त्यावर तोड कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालिकेने बेकायदा बांधकामांना नियमबाह्य व संगनमताने करआकारणी केली असून ती रद्द करण्याची मागणीसुद्धा ट्रस्टने केली आहे.पालिकेच्या नगररचना विभागाने सदर जागेत बांधकाम परवानगी दिली नसल्याचे लेखी पत्र दिले आहे. प्रभाग समिती-१ च्या करनिरीक्षक यांनी तर माहिती अधिकारात उत्तर देताना मिळकतीचा बोध होत नाही व माहिती देणे अडचणीचे होत असल्याचे लेखी दिले आहे. करआकारणी करण्यासाठी जोडलेली कागदपत्रेच उपलब्ध नसल्याचे नमूद करत केवळ म्हात्रे यांच्या नावे करआकारणी असलेल्या १४ मालमत्तांचा तक्ताच त्यांनी दिला आहे.प्रशासनाकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोपदेवस्थानची जागा बळकावून त्यावर बेकायदा बांधकामे जगदेव म्हात्रे यांनी केली. पालिकेशी संगनमत करून नियमबाह्यपणे करआकारणी केली. जमीन बदलीचा व्यवहार न करता परस्पर गौरूबाई व कुटुंबाकडून जमीन खरेदी करून गावाची फसवणूक केली आहे. पालिका, महसूल तसेच पोलीसदरबारी म्हात्रेंचे वजन असल्याने तक्रारी करूनसुद्धा कुणी कारवाई करत नाही. ट्रस्टच्या जमिनीवरील बांधकामे तोडून पालिकेने जागा मोकळी करून द्यावी. अन्यथा, ग्रामस्थ आंदोलन करतील.- रमेश पाटील, अध्यक्ष, राधाकृष्ण मंदिर ट्रस्टगावासाठी आजपर्यंत शक्य तेवढे योगदान मी देत आलो आहे. देव राधाकृष्ण आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादाने माझी प्रगती झाली असून मी खरेदी केलेली मंदिराजवळील जमीन गावासाठी मोकळीच ठेवलेली आहे. ती ट्रस्टच्या नावे करून देण्यासाठी ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांची मंजुरी आणली पाहिजे. ती न आणता उलट द्वेषबुद्धीने ट्रस्टींनी असे प्रकार करून गावाची बदनामी करू नये.- जगदेव म्हात्रे, अध्यक्ष, गावपंच मंडळ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी