तक्रारदारास नगरसेवकाने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:40+5:302021-06-16T04:52:40+5:30

भिवंडी : येथील एका इमारत संकुलातील बेकायदा बांधकामासह मोकळ्या जागेतील धार्मिक स्थळ संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पालिकेस ...

The complainant was beaten by the corporator | तक्रारदारास नगरसेवकाने केली मारहाण

तक्रारदारास नगरसेवकाने केली मारहाण

भिवंडी : येथील एका इमारत संकुलातील बेकायदा बांधकामासह मोकळ्या जागेतील धार्मिक स्थळ संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पालिकेस कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तीस भाजप नगरसेवक निलेश चौधरी व त्यांच्या साथीदारांनी लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करण्याची घटना सोमवारी अंजूरफाटा येथे घडली. विनेश कांतीलाल गुटका ( ५२ ) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अंजूरफाटा येथील महावीर रेसिडेंसी मधील इमारतीत राहणारे विनेश यांनी बिल्डरने अतिक्रमण करुन बांधकाम केल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. त्याची शहानिशा करुन याठिकाणी संरक्षक भिंतीसह काही इमारतीमध्ये अतिरिक्त बांधकाम व मोकळ्या जागेत धार्मिकस्थळ हे बेकायदा बनविल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी पालिकेचे पथक संरक्षक भिंत तोडत असताना त्या ठिकाणी भाजप नगरसेवक चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह पोहचले व त्यानंतर तक्रारदार विनेश यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनेश यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत तक्रारदाराने नारपोली पोलिसांकडे तक्रार दिली असता पोलिसांनी चौधरी व त्यांच्या साथीदार विरोधात गुन्हा दाखल केला असून अजून याप्रकरणी कोणासही ताब्यात घेतलेले नाही.

Web Title: The complainant was beaten by the corporator