शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई, सेफ्टी टँकमध्ये झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 8:35 AM

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना जातीचा दाखला सादर करण्याची अट रद्द करा, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन  बुरपुल्ले यांनी दिले आहे.

ठाणे : ठाण्यात ९ मे २०१९ रोजी एसटीपी टाकीत मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचा दहा लाख रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव नारायण दास यांनी दिली.ठामपाच्या  नरेंद्र बल्लाळ सभागृहात मनपा अधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत नारायण दास, सल्लागार पूर्ण लाल, ठामपा उपआयुक्त (मुख्य) विजयकुमार म्हसाळ, उपआयुक्त अशोक बुरपुले, सहायक आयुक्त शंकर पाटोळे, श्रमिक जनता संघाचे चिटणीस व सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, म्युनिसिपल लेबर युनियनचे सरचिटणीस बिरपाल भाल, सेक्रेटरी चेतन आंबोणकर व साधना गहनवाल आदी उपस्थित होते. मृत पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळत असली तरीही एसटीपी टाकीत मरता मरता वाचलेल्या पाच सफाई कामगारांच्या पुनर्वसनाची मागणी यावेळी जगदीश खैरालिया यांनी केली. केंद्र सरकारने २०१३ साली केलेल्या मॅन्युल स्केवेंजीग कायद्यानुसार व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार १९९३ पासून मैला सफाईच्या कामात लिप्त असलेल्या सफाई कामगारांचा शोध घेऊन त्यांना ४० हजारांची रोख मदत देणे व अन्य सम्मानजनक व्यवसायात पुनर्वसन करणेबाबत शासनाने योजना राबवावी, असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाला अशा सूचना देण्याचे दास यांनी मान्य केले. सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना जातीचा दाखला सादर करण्याची अट रद्द करा, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन  बुरपुल्ले यांनी दिले आहे. निवृत्तीनंतर सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेतील घर देण्यासाठी २५ वर्षे सेवा पूर्ण करण्याची अट शिथिल करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली.  

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका