शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

६५ मिमी पावसानंतरच वारसांना भरपाई, सरकारचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 2:29 AM

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे. कारण, ज्या दिवशी मृत्यू झाले, त्या दिवशी ६५ मिमी पाऊस झाला नसेल, तर मृतांचे नातलग मदतीला पात्र ठरत नाहीत, असा अत्यंत संतापजनक निकष मदत देताना नोकरशाहीने लागू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पावसाचे पाणी साचले असताना विजेचा शॉक लागून मरण पावलेली, झाड पडून मरण पावलेली किंवा पुराच्या पाण्यातून वाट काढताना बुडालेली व्यक्ती मदतीस पात्र ठरत नाही.गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांना भरपाईसाठी राज्य शासनाकडून २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या रकमेतून शासकीय मदतीचे वाटप सुरू आहे. जे पुराच्या पाण्यात वाहून गेले, दरड कोसळून मयत झाले अथवा वीज पडून मृत्यू झाले, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी पाऊस पडलेला असणे अनिवार्य आहे. तरच, मयत व्यक्तींचा परिवार शासनाच्या मदतीस पात्र ठरतो. जिल्ह्यात या निकषानुसार मृत पावलेल्या १३ व्यक्तींचे परिवार भरपाईस पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर अन्य विविध कारणांमुळे दगावलेल्यांनाही मदतीस अपात्र ठरवले आहे. सरकारची ही अट संतापजनक आहे. अशा अटींमुळे मृतांच्या नातलगांना मदतीपासून वंचित ठेवण्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.पावसाच्या काळात मरण पावलेल्या १२ व्यक्तींच्या परिवारांना ४८ लाखांची शासकीय मदत देण्यात आली आहे. एका मयत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक १० जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील केवळ तीन जणांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले आहेत. उर्वरित सात मयत व्यक्तींचे नातेवाईक मदतीस अपात्र ठरवल्यामुळे ते वंचित आहेत. यामध्ये तलावात बुडून मरण पावणाऱ्या दोन जणांचा, विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या दोन जणांचा तसेच स्पाइस अ‍ॅण्ड राइस हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शॉक लागून मरण पावलेल्या दोन जणांचा समावेश आहे. याखेरीज, पाण्याच्या टाकीत बुडून निधन झालेल्या एका व्यक्तीस आणि पोहण्यासाठी गेला असता बुडून दगावलेल्या एकाला शासनाच्या मदतीस अपात्र ठरवलेले आहे.कल्याण तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील चौघेही शासनाच्या मदतीस पात्र ठरवलेले आहेत. यामध्ये एक पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे, तर कल्याण येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या कम्पाउंडची भिंत पडून तिघे मयत झाले आहेत. त्यांच्या नातेवाइकास मदत दिली आहे. उर्दू शाळेची भिंत पडली, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी या मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडलेला होता. यामुळे त्यांचे नातेवाईक मदतीस पात्र ठरले, अन्यथा ते मदतीला अपात्र ठरले असते. पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा भिंत कोसळणे या घटना घडतात, तेव्हा अगोदर झालेल्या पावसामुळे किंवा बेकायदा बांधकामांमुळे त्या कोसळतात. त्या दिवशी झालेला पाऊस हा केवळ निमित्त असतो. त्यामुळे त्या दिवशी किती पाऊस झाला, हा निकष लावून मदत देणे हा तुघलकी निर्णय असल्याचे मृतांच्या नातलगांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्यातील त्या चौघांच्या परिवारास सुमारे १२ लाखांची मदत मिळाली आहे.भिवंडी तालुक्यातील पाचपैकी तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि एक वीज पडून दगावला आहे. त्यामुळे या चौघांचे परिवार मदतीस पात्र ठरले आहेत. यातील तिघांच्या परिवारांसही १२ लाख रुपये मिळाले, तर एकाचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असल्याचे समजते. उर्वरित एक नऊ वर्षांचा मुलगा तळघरात पाणी साचले असता, त्यात बुडून मयत झाला आहे. त्याला अपात्र ठरवल्यामुळे परिवारास मदत मिळालेली नाही.धबधब्यात बुडाल्यास भरपाईस अपात्रअंबरनाथमधील तिघांपैकी एकास पात्र ठरवून त्याच्या परिवारास चार लाखांची मदत दिली. अपात्रांपैकी एका रिक्षाचालकाच्या अंगावर झाडाची फांदी, विजेच्या तारा व शेड कोसळली. तसेच कोंडेश्वर धबधब्यात बुडलेल्या तरुणाचे नातेवाईकही मदतीस अपात्र ठरले आहेत.उल्हासनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ते मदतीस अपात्र ठरले. या दोघांपैकी एकाचा स्लॅब अंगावर पडून, तर दुसºयाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शहापूरच्या पुरात एकाचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्याच्या परिवारास मदत मिळावी, यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरthaneठाणेGovernmentसरकार