पालिकेची मॅरेथॉन रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी, पूरग्रस्तांना मदत करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 11:46 PM2019-08-13T23:46:37+5:302019-08-13T23:46:48+5:30

मीरा- भार्इंदर महापालिकेची १८ आॅगस्ट रोजी होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची मागणी काँग्रेससह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चालवली आहे.

Community organizations demand cancellation of marathon | पालिकेची मॅरेथॉन रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी, पूरग्रस्तांना मदत करा

पालिकेची मॅरेथॉन रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी, पूरग्रस्तांना मदत करा

googlenewsNext

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेची १८ आॅगस्ट रोजी होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची मागणी काँग्रेससह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चालवली आहे. काँग्रेसचे नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.

महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा विविध कारणांनी वादग्रस्त ठरली आहे. राजकीय आणि आर्थिक गैरप्रकार तसेच नाहक उधळपट्टी अशा स्वरूपाच्या आरोपांच्या फैरी पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर झडत आहेत. त्यातच काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सावंत, प्रवक्ते प्रकाश नागणे आदींनी मंगळवारी पालिका आयुक्तांच्या नावे या बाबतचे निवेदन दिले.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, खानदेश आदी विविध भागात पुरामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. लाखो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. राज्यात दुखाचे वातावरण असताना मॅरेथॉनचे पालिकेने आयोजन करणे योग्य नसल्याने ती रद्द करून त्याचा निधी मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त सहायता निधीत देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे आणि सहायक आयुक्त संजय दोंदे यांना काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदन दिले. जनता दल (से.) चे मिलन म्हात्रे, गोवर्धन देशमुख, संतोष पेंडुरकर, विश्वनाथ तायडे, वंचित बहुजन आघाडी, प्रदीप जंगम, कृष्णा गुप्ता, गणेश फडके, भावना तिवारी, मनसेचे शहर संघटक हेमंत सावंत व प्रमोद देठे, माजी नगरसेवक रोहित सुवर्णा तसेच सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक आदींनीही मॅरेथॉन रद्द करुन निधी पूरग्रस्तांना देण्याची मागणी केली.

स्पर्धा बेकायदा
ही स्पर्धा बेकायदा असल्याचे महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक असोसिएशनने स्पष्ट केले आहे.जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनची कोणतीच परवानगी घेतलेली नाही. सहायक आयुक्त संजय दोंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: Community organizations demand cancellation of marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.