शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

भाजपा सरकारवर कम्युनिस्टांचा हल्लाबोल,  मुख्यमंत्री क्लीन चीट देतात- प्रकाश रेड्डी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 19:10 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला. 

डोंबिवली - डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला.     कॉ. शहीद भगतसिंग मित्र मंडळांच्या वतीने लोढा हेवन येथे रशियन क्रांतीकारक लेनिन, छत्रपतीशिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यातील जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महेश आवारे यांनी केले होते.  यावेळी भाकप सचिव अरूण वेळासकर, मुंबई पक्षाचे नेते सुबोध मोरे, अक्षय पाठक, काळु कोमास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.     रेड्डी यांनी देशातील व राज्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक व राजकीय परिस्थिती बाबत भाजपा सरकारला धारेवर धरत विविध युगपुरूषांची आठवण करून दिली. यावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निमिर्ती केली. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिवाजी महाराजांनी शेतक:यांना अभय दिला होता. परस्त्रीचा सन्मान केला होता. परंतु आज देशात स्त्रियाबाबत काय चालले आहे. आपल्या देशात ज्या घटना घडत आहेत त्यामुळे मान शरमेने खाली जाते. ज्योतिबा फुले यांनी भांडवलीशाही व भटशाही विरोधात आंदोलन केले. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणो शहरातील जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले असते. तर कुणी लोढा येथे दिसले नसते. घरे स्वस्त मिळाली असती. या देशात कार्पीरेट अंबानी यांचे राज्य जाऊन कामगार, शेतकरी, कष्टकरी, आदीवासी महिला यांचे राज्य यावे. समाजवाद यावे. रशियातील लेनिन क्रांतीचा परिणाम बाबासाहेब आंबडेकर , रविंद्रनाथ टागोरां वर झाला. या सर्व युगपुरूषांचे विचार घेऊन सरकारांच्या विरोधात लढले पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार