उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांचा दिव्यांगा सोबत संवाद, मतदानाबाबत जनजागृती
By सदानंद नाईक | Updated: April 13, 2024 19:25 IST2024-04-13T19:24:25+5:302024-04-13T19:25:21+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्देशानुसार शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवा सोबत संवाद साधून मतदानाबाबत माहिती ...

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांचा दिव्यांगा सोबत संवाद, मतदानाबाबत जनजागृती
सदानंद नाईक
उल्हासनगर : सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्देशानुसार शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवा सोबत संवाद साधून मतदानाबाबत माहिती दिली. अपंग विकास दिव्यांग संघटनेचे राजेश साळवे यांच्या सहकार्यातून दिव्यांगांची बैठक यावेळी पार पडली.
उल्हासनगर महापालिका दिव्यांग विभागाचे प्रमुख व निवडणूक नोडल अधिकारी राजेश घनघाव, निवडणूक विभाग प्रमुख विशाल कदम, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांच्यासह नितीन गावंडे, पंडीत माळी, प्रविण दिंडोर्डे यांच्यासह दिव्यांग आयकॉन डॉ. अशोक भोईर आदींनी आयोजित केलेल्या दिव्यांग बांधवाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. दिव्यांग बंधूची या बैठकीला उपस्थिती लक्षणीय होती. लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणुक आयोगाने दिलेल्या सुविधा व विविध अप बाबत चर्चा केली. दिव्यांग बंधू व भगिनींना मतदान करणेबाबत महापालिका अधिकारी विशाल कदम, राजेश घनघाव, नितीन गावंडे, स्वीप नोडल अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी आवाहन केले.
तसेच दिव्यांग बांधवांशी त्यांना येणाऱ्या अडचणी त्यावर शासनाने केलेल्या उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. नोडल अधिकारी राजेश घनघाव व दिव्यांग व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी सदरील कार्यक्रमाचे उद्देश्य कथन करून कार्यक्रमाला सुरवात केली.