शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

आयुक्तांचा इशारा फुसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:40 AM

ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºया सोसायट्या, आस्थापना आणि फेरीवाले यांचा कचरा १ डिसेंबरपासून न उचलण्याचा निर्धार केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी केला होता.

- मुरलीधर भवारकल्याण : ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºया सोसायट्या, आस्थापना आणि फेरीवाले यांचा कचरा १ डिसेंबरपासून न उचलण्याचा निर्धार केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी केला होता. त्यासंदर्भात आरोग्य विभागाने १० हजारांपैकी तीन हजार सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. तर, उर्वरित सात हजार सोसायट्यांना नोटिसा पाठवण्याचे काम अजूनही सुरू आहे. परिणामी, कारवाई लांबल्याने आयुक्तांचा इशारा पुन्हा फुसकाच ठरल्याची चर्चा सुरू आहे.ओला-सुका कचरा वेगवेगळा गोळा करून तो घंटागाडी व कचरा डेपो येथे जमा करावा, असे आवाहन महापालिकेने वारंवार नागरिकांना केले आहे. कचरा वर्गीकरण तसेच जागेवरच प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी, अशी सक्ती करणाºया नोटिसाही महापालिकेने एप्रिलमध्ये बड्या सोसायट्यांना पाठवल्या होत्या. त्यावेळी १ मे महाराष्ट्र दिनापासून कचरा उचलला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून झालीच नाही. त्यावेळी नागरिकांनी महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी भाषा केली. आधी कचराकुंड्या, कचºयाचे डबे पुरवा, प्रकल्पाचे काम सुरू करा, मगच कचरा न उचलण्याचा इशारा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे महापालिकेची प्रक्रिया थंडावली.आयुक्तांनी पुन्हा नोव्हेंबरमध्ये सांगितले की, १० हजार सोसायट्यांना कचरा वर्गीकरणाच्या नोटिसा पाठवण्यात येतील. १ डिसेंबरपासून त्यांचा कचरा उचलला जाणार नाही. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यासाठी १ डिसेंबरपूर्वीच १० हजार सोसायट्यांना नोटिसा पाठवणे गरजेचे आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत तीन हजार सोसायट्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून सोसायट्यांनी १५ दिवसांत कचरा वर्गीकरणाचे काम सुरू करणे अपेक्षित आहे. अन्यथा, त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. उर्वरित सात हजार सोसायट्यांना डिसेंबरपर्यंत नोटिसा बजावणे अपेक्षित आहे.सोसायट्या व आस्थापना यांनी ओला-सुका कचरा वेगवेगळा जमा करून तो महापालिकेकडे देणे बंधनकारक आहे. फेरीवाल्यांवरही त्यांचा कचरा डेपोत जमा करण्याची जबाबदारी राहणार आहे. महापालिका कचरा उचलणे बंद करणार आहे. वर्गीकरण करून न दिलेला कचरा महापालिका स्वीकारणार नाही. सुका कचरा रविवार व गुरुवारी, तर ओला कचरा इतर दिवशी उचलणार आहे, असा इशारा देऊनही महापालिका सर्व कचरा उचलत आहे. त्यामुळे १ डिसेंबरची डेडलाइन पाळलेली नाही.वर्गीकरण केलेला कचरा टाकणार कुठे?कचºयावरील शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने अद्याप घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केलेले नाहीत. कचरा वर्गीकरण करून तो टाकणार कुठे? डम्पिंग ग्राउंडवर एकाच ठिकाणी टाकणार असाल, तर वर्गीकरणाची सक्ती का, असे विविध प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.>कचºयाचे कोट्यवधींचे कंत्राट, कामगारांच्या पगाराचा मुद्दा ऐरणीवरकचरावाहनांवर ४०३ कचरावाहक व सफाई कामगार विशाल एक्सपर्ट ही कंत्राट कंपनी पुरवत आहे. कचरा नेणे व उचलण्यासाठी प्रत्येक कामगारास १७ व १८ हजार रुपये पगार महापालिकेकडून कंत्राटदाराला दिला जात आहे. मात्र, कंत्राटदार कामगाराला केवळ १० हजार १३६ रुपयेच पगार देत आहे. तोही पगार २४३ कामगारांना दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. कंत्राटी कामगारांच्या वारंवार होणाºया आंदोलनामुळे कचरा उचलला जात नाही. चार प्रभाग क्षेत्रांत कचरा उचलणे व त्याचे वर्गीकरण करण्यासाठी १०७ कोटी रुपये खर्चाचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे.