प्रभागतील विकासकामांना आयुक्तांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:43+5:302021-03-22T04:36:43+5:30

उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापती अंजली साळवे यांच्या विनंतीनुसार आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी ...

Commissioner's approval for development works in the ward | प्रभागतील विकासकामांना आयुक्तांची मंजुरी

प्रभागतील विकासकामांना आयुक्तांची मंजुरी

उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापती अंजली साळवे यांच्या विनंतीनुसार आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी भेट घेऊन विकासकामांची माहिती घेतली. तसेच साळवे यांनी सुचविलेल्या अनेक विकासकामांना हिरवा कंदील दाखविला आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे उपस्थित होते.

बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पगारे, डॉ. अमृता मोरे, बांधकाम विभागाचे अधिकारी अश्विनी अहुजा, पाणीपुरवठा विभागाचे बी. एस. पाटील, सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे, आदी उपस्थित होते. यावेळी साळवे यांनी प्रभागातील अनेक विकासकामांची माहिती आयुक्तांना देऊन प्रलंबित असलेल्या कामांची माहिती दिली. शहरातील कॅम्प नं. ५ दुर्गापाडा येथील आरोग्य केंद्रात सुविधा व साहित्य देण्याची मागणी करण्यात आली. प्रभाग क्र. १८ येथील आरोग्य केंद्र आठवड्यातील पाच ऐवजी सहा दिवस सुरू करा, कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी येथील जीर्ण झालेल्या पुलाच्या कामासाठी अर्थसंकल्पात ७० लाखांची तरतूद करणे, प्रभाग समिती क्र. ४ अंतर्गत सर्व उद्यानाच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक व माळी नियुक्त करणे, पाणीपुरवठ्याची वेळ नियमित करणे व दैनंदिन वेळापत्रक सर्व नगरसेवकांना कळविणे, पाणी गळती व देखभाल वेळेवर होण्याकरिता योग्य ठेकेदार नेमणूक करणे, सर्व जलकुंभांना संरक्षण भिंत व गेट लावणे, बंद पडलेल्या बोअरवेल सुरू करणे, उद्यानात नवीन बोरवेल टाकणे, कॅम्प क्र. ५ येथील डम्पिंग ग्राउंडच्या हस्तांतराची प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

चौकट

आयुक्तांची भूमिक सकारात्मक

केबिन आयुक्त म्हणून टीका होत असलेले आयुक्त डॉ. राजा दयानिधी शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यातूनच त्यांनी प्रभाग समिती क्र. चारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रभागातील विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Commissioner's approval for development works in the ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.