शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांनी केले ७ गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक 

By धीरज परब | Updated: August 25, 2023 13:46 IST

सदर मासिक बैठकीत गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड -  जुलै महिन्यात गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ७ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पुरस्कार देत कौतुक केले .  सदर मासिक बैठकीत गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला . 

नालासोपारा येथे दुचाकीचा आरसा लागला म्हणून राजेश यादव ची हत्या केलेल्या तीन आरोपीना ८ तासात पकडण्यात आले होते . तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे , माध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल राख व पोलीस पथकास उत्कृष्ट तपास बद्दल पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले . 

वालिव पोलिसांनी ४६ हजारांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत तब्बल १७ गुन्हे केलेल्या चार जणांच्या टोळीला पकडून साडे पाच लाखांचा ऐवज हस्तगत केला म्हणून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांना  दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले .    

बँकेतून कर्ज मिळवून देण्यासाठी कॅन्सल धनादेश घेऊन ते लबाडीने वटवून फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी कौशल्याने तपास करत पश्चिम बंगाल , झारखंड मधील ५ आरोपीना अटक केली .  श्या प्रकारे केलेले ४ गुन्हे उघडकीस आणले बद्दल तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह बागल व पथकास तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .  

हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असणारा आरोपी सय्यद आफताब हसन हा संचित रजा घेऊन पसार झाला असता गुन्हे शाखा १ च्या पथकाने त्याला मध्यप्रदेश म्हणून पकडून आणल्या बद्दल पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना स्पेशल रिवॉर्ड चे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले .  

वसईच्या  येथील घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीना अटक करून त्यांनी केलेले ६ गुन्हे उघडकीस आणल्या प्रकरणी वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित आंधळे यांना स्पेशल रिवॉर्ड २ चा पुरस्कार दिला .  

वसईच्या मालजीपाडा येथील भंगार विक्रेत्यास घरात घुसून चाकूच्या धाकाने लुटल्याच्या गुन्ह्याचा तपास करून लूट करणाऱ्या ३ आरोपीना अटक करत ४ गुन्हे उघडकीस आणल्या बद्दल वसई गुन्हे शाखा २ चे निरीक्षक शाहूराज रणावरे यांना स्पेशल रिवॉर्ड ३ चे पारितोषिक मिळाले .  

भाईंदरच्या एका दाताच्या दवाखान्यात सर्जरी आदींचे ३५ लाखांचे सामान कमर्चारीने चुकून दुसऱ्या गाडीच्या डिकीत ठेवले होते . सीसीटीव्ही फुटेज व तपासाचे कौशल्य दाखवून पोलिसांनी सामान मिळवून दिल्या बद्दल नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना  स्पेशल रिवॉर्ड ४ चे पारितोषिक आयुक्तांनी दिले .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस