शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पालिका अर्थसंकल्पावर आयुक्तांनी घेतली बैठक, ठामपा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 01:04 IST

बदल्यांमध्ये झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे तो लांबणीवर गेला असून आयुक्तांनी सुटीचा अर्ज दिल्याने तो कोण सादर करणार याकडे लक्ष लागले आहे.

ठाणे : मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनावर दबाव आणला आहे. मात्र, असे असले तरी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांत झालेला वाद, त्यानंतर बदल्यांमध्ये झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे तो लांबणीवर गेला असून आयुक्तांनी सुटीचा अर्ज दिल्याने तो कोण सादर करणार याकडे लक्ष लागले आहे.गेली काही वर्षे या ना त्या कारणाने ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होत असतो. विकासकामे वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनीधींवर व्यक्त होतो. त्यामुळे अर्थसंकल्प वेळेत मंजूर व्हावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींतील वादामुळे गेल्या काही वर्षांत अर्थसंकल्प मंजुरीसाठी आॅक्टोबर ते डिसेंबर महिना उलाडत आहे. आतादेखील आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजवरून झालेला वाद आणि त्यात लोकप्रतिनिधींनी घेतलेली उडी यामुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मुंबई, कल्याण, उल्हासनगर महापालिकांचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. मात्र, ठाण्याचा अर्थसंकल्प सादर न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.>आयुक्तांनी केली चर्चादरम्यान आयुक्तांनी मंगळवारी बंगल्यावर अधिकाºयांची बैठक घेतल्याची माहिती पुढे येत आहे. त्यानुसार या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता येत्या काही दिवसांत तो मंजुरीसाठी सादर होऊ शकतो, अशीही शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, तो कोण सादर करणार हा मुख्य प्रश्न आहे.अतिरिक्त आयुक्तांकडे आज पदभार सोपविणारपालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका आयुक्त दिर्घकालीन सुटीवर जाण्यापूर्वी बुधवारी पालिकेत हजेरी लावून अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे पदभार सोपवून जाणार आहेत. त्यानुसार तेच अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे