शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आ. नरेंद्र मेहतांच्या हॉटेलच्या थकीत मालमत्ता कराचा अहवाल सादर करा; लोकमतच्या बातमीवरुन अतिरीक्त आयुक्तांचे कर विभागाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 18:54 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असुन या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये २८ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते.

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असुन या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये २८ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिकेचे अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी घेत कर विभागाला त्याचा अहवाल त्वरीत सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. या हॉटेलचे व्यवस्थापन मेहता यांच्या मे. सेव्हन ईलेव्हन हॉटेल्स प्रा. लि. कंपनीमार्फत चालविले जाते. तर त्यांचे धाकटे बंधू विनोद हॉटेलचे संचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलची मागील वर्षांची थकबाकी सुमारे १८ लाख इतकी असतानाही प्रशासनाने अद्याप त्याच्या वसुलीसाठी कागदी घोडे नाचविण्याखेरीज कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षातील थकीत कराचा आकडा सुमारे २३ लाखांवर गेला असला तरी त्यावर महिन्याला २ टक्के व्याज कर विभागाकडुन आकारले जात आहे. त्यामुळे थकीत कराचा आकडा सव्याज २५ लाखांपर्यंत गेल्याचे कर विभागातून सांगण्यात येत आहे. पालिकेच्या मुख्य उत्पन्नस्त्रोतापैकी एक असलेला मालमत्ता कर हा महत्वाचा उत्पन्न स्त्रोत मानला जात असतानाही कर विभागाने अद्याप ५० टक्केच कर वसुल केल्याचा धक्कादायक कारभार २० फेब्रुवारीला पार पडलेल्या महासभेत काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी उजेडात आणला. या कराच्या १०० टक्के वसुलीसाठी कर विभागाकडे केवळ एक महिना शिल्लक असतानाही विभागाकडुन वसुलीची तीव्र मोहिम सुरु केली जात नाही. दरम्यान अतिरीक्त आयुक्तांनी किमान एक लाखांचा कर थकविणाऱ्यांच्या मालमत्तांना थेट सील ठोकण्याचे आदेश कर विभागाला दिले. त्याप्रमाणे काही बिल्डरांच्या मालमत्तांना कर विभागाने सील ठोकण्याचे धाडस विभागाकडुन दाखविण्यात आले. मात्र मेहता यांच्या हॉटेलने थकविलेल्या कराची वसुली करण्याची धमक दाखविली जात नसल्याने नागरीकांत रोष निर्माण झाला आहे. गतवर्षी तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहिम सुरु करीत शाळा, रेल्वे स्थानक व रुग्णालयांना देखील अभय दिले नाही. मात्र त्यावेळी देखील या हॉटेलच्या थकीत कर निदर्शनास आला नाही का, त्यासाठी पालिका अधिनियमात वेगळी तरतूद नमुद करण्यात आली आहे का, असा प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित होऊ लागला आहे. त्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर अतिरीक्त आयुक्तांनी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश कर विभागाला दिले आहेत. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल कर विभागाने त्वरीत प्रभाग समिती सहाअंतर्गत चेणे येथील कर विभागाला सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याचा अंतिम अहवाल तयार करण्यास चेणे विभागाकडुन दिरंगाई होत असल्याचे सुत्रांकडुन सांगण्यात येत आहे.

याप्रकरणाचा आढावा घेऊन त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश कर विभागाला देण्यात येईल. -  आयुक्त बी. जी. पवार

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक