शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

आ. प्रताप सरनाईकांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:40 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे. त्यावर आ. प्रताप सरनाईक यांनी भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणाला ब्रेक लावण्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत नियोजित नाट्यगृह पूर्णत्वास जाण्याचे साकडे देखील त्यांना घातले आहे.२०११ मध्ये दहिसर चेकनाका परिसरात असलेल्या डी. बी. रिअ‍ॅल्टी या विकासाच्या गृहप्रकल्पाला पालिकेने बांधकाम परवानगी दिली. त्यापोटी पालिकेला मिळालेल्या आरजी (रिक्रिएशन ग्राऊंड)वर नाट्यगृह बांधण्यात यावे, अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी पालिकेकडे केली. परंतु ही जागा बिल्डरच्याच घशात घालण्याचे कटकारस्थान काही भ्रष्ट अधिका-यांकडून सुरू झाल्याने ती पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून पालिकेकडे आणण्यास आ. सरनाईक यांना यश आले.शहरात एकही नाट्यगृह उपलब्ध नसल्याने स्थानिक नाट्यरसिकांना बोरिवली अथवा दादर येथे जावे लागते. त्यामुळे शहरातच नाट्यगृह बांधल्यास स्थानिक नाट्यरसिकांची सोय होऊन नाट्यकलाकारांना शहरातच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, यासाठी नाट्यगृहाची मागणी सरनाईक यांनी पालिकेकडे रेटून धरली. विकासकाने बांधलेल्या गृहप्रकल्पासाठी या जागेचा टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट) वापरण्यात आल्याने त्याच्या मोबदल्यात विकासकाने स्वखर्चातून नाट्यगृह बांधण्याचे पालिकेकडून निश्चित करण्यात आले.परंतु विकासाकडून सतत विलंब होऊ लागल्याने अखेर १७ नोव्हेंबरच्या पाहणी दौ-यात सरनाईक यांनी विकासकाला नाट्यगृहाच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करण्याचे निर्देश दिले. पालिकेने देखील विकासकाला बांधकाम परवानगी देत बांधकाम पूर्णत्वासाठी डिसेंबर २०१८ पर्यंतचे अल्टिमेटम दिले. त्याचे काम सुरू झाल्यानंतर महापौर डिंपल मेहता यांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वावरच संशय व्यक्त करून त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे. त्यात अनेक वर्षांच्या विलंबानंतरही विकासकाकडून डिसेंबर २०१८ पर्यंत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ती जागा पालिकेच्या ताब्यात दिल्यास त्याचे बांधकाम पालिकेकडून केले जाईल.विकासाच्या दिरंगाईला चाप लावण्यासाठीच बांधकाम परवानगीवर टाच आणण्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची कुणकुण सरनाईक यांना लागताच त्यांनी महापौरांच्या कुरघोडीवर सडकून टीका करीत भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्यावरही शरसंधान साधले. यामुळे ८ डिसेंबरची महासभा वादळी ठरण्यापूर्वीच महापौरांचा प्रस्ताव गुंडाळला जावा, यासाठी सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.राणेंच्या स्वाभिमानचा नाट्यगृह पूर्णत्वाला पाठिंबाकाँग्रेसचे आ. नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेनेही महापौरांच्या, नाट्यगृहाची परवानगी रद्द करण्याच्या मनसुब्यावर प्रहार करीत सेनेच्या कारभारावरही आसूड ओढले आहे. संघटनेचे मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) उपाध्यक्ष मनोज राणे यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिलेल्या पत्रात नाट्यगृहाच्या बांधकामाची परवानगी रद्द न करता ते पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी केली आहे. मोठ्या विलंबानंतर नाट्यगृहाचे बांधकाम सुरु झाले असताना सत्ताधारी भाजपा व विरोधी बाकावरील शिवसेना यांच्यातील राजकीय कुरघोडीमुळे शहरवासीय विकासाला मुकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकमेकांच्या कुरघोडीत भाजपाने बहुमताच्या जोरावर नाट्यगृहाची परवानगी रद्द केल्यास स्वाभिमानकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा अखेर इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक