कळव्यात विवाहितेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:25 IST2017-07-23T23:25:08+5:302017-07-23T23:25:08+5:30

पती परराज्यात कामावर गेल्याची संधी साधून कळव्याच्या घोलाईनगर झोपडपट्टी परिसरातील एका ३२ वर्षीय विवाहितेवर पाच जणांच्या टोळीपैकी दोघांनी

Collective atrocities on marriages | कळव्यात विवाहितेवर सामूहिक अत्याचार

कळव्यात विवाहितेवर सामूहिक अत्याचार

आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 23 - पती परराज्यात कामावर गेल्याची संधी साधून कळव्याच्या घोलाईनगर झोपडपट्टी परिसरातील एका ३२ वर्षीय विवाहितेवर पाच जणांच्या टोळीपैकी दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पती तीन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काही कामानिमित्त गेल्यामुळे ही महिला तिच्या तीन मुलांसमवेत घरात एकटीच होती. सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास कोणीतरी तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिने तो उघडला तेंव्हा बाहेर कोणीही नव्हते. पण ५ ते १० मिनिटांच्या अंतराने पाच-सहा जणांचे टोळके तिच्या घरात शिरले. त्यांच्यापैकी दोघांनी तिची १२ वर्षांची मुलगी, तसेच आठ व नऊ वर्षांच्या दोन मुलांना धरुन ठेवले आणि उरलेल्या दोघांनी तीन मुलांसमोरच तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तक्रार करु नये म्हणून तिला धमकी दिली. एकाने तिच्या अंगावर अ‍ॅसिडसारखा एक पदार्थ फेकल्याने शरीरावर काळा डाग पडल्याने तिने तक्रारीत म्हटले आहे. तिने आरडाओरडा करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि कळवा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक आयुक्त रमेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तिच्या अंगावर कोणते रसायन टाकले त्याचीही तपासणी सुरू आहे.

Web Title: Collective atrocities on marriages