भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: August 7, 2016 15:03 IST2016-08-07T08:09:14+5:302016-08-07T15:03:30+5:30
भिवंडीतील हुनमान टेकडी परिसरातील दोन मजली इमारत रविवारी सकाळी कोसळली. सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. ७ - भिवंडीतील हुनमान टेकडी परिसरातील दोन मजली इमारत रविवारी सकाळी कोसळली. सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विनोद साईजिंगजवळ ही दुमजली इमारत होती. एकूण तीन कुटुंब या इमारतीत रहात होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत चार जणांना ढिगा-याखालून बाहेर काढले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. आठवडयाभरात भिवंडीमध्ये इमारत कोसळण्याची ही दुसरी दुर्घटना घडली आहे.
भिवंडी महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. दोनवेळा ही इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. या इमारतीचे वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तरीही रहिवाशी जीव धोक्यात घालून या इमारतीत रहात होती.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असले तरी, ही इमारत दाटी-वाटीच्या भागात असल्याने अग्निशमन दलाच्या गाडयांना त्या ठिकाणी पोहोचायला विलंब लागत आहे. मागच्या रविवारी भिवंडीतील गैबी नगर भागातील दोन मजली इमारत कोसळून नऊ जण ठार झाले होते. ही इमारत सुद्धा पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली होती. मात्र रहिवाशी जीव धोक्यात घालून इथे रहात होते.
Visuals of the spot where a two-storey building collapsed this morning, many feared buried under debris pic.twitter.com/eUwonCSfs2
— ANI (@ANI_news) August 7, 2016
Visuals of the spot where a two-storey building collapsed this morning, many feared buried under debris pic.twitter.com/QwCXI3MFJk
— ANI (@ANI_news) August 7, 2016