विविध कला आणि सामाजिक विषयांवर आधारित निवडक कार्यक्रमाचा कोलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:30+5:302021-04-19T04:37:30+5:30

ठाणे : ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार दिवंगत रत्नाकर मतकरींच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेले वर्षभर प्रत्येक ...

Collage of selected programs based on various arts and social topics | विविध कला आणि सामाजिक विषयांवर आधारित निवडक कार्यक्रमाचा कोलाज

विविध कला आणि सामाजिक विषयांवर आधारित निवडक कार्यक्रमाचा कोलाज

ठाणे : ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार दिवंगत रत्नाकर मतकरींच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेले वर्षभर प्रत्येक महिन्यात १७ तारखेला संस्थेतर्फे मतकरी स्मृतिमाला आयोजित करण्यात आली. चित्रकला, अभिवाचन, अभिव्यक्ती, नृत्य, नाटिका अशा कलांबरोबरच ऑनलाइन शिक्षण, शेतकरी आंदोलन, मिट्टी सत्याग्रह अशा ज्वलंत मुद्यांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांतील सादरीकरणातून काही निवडक सादरीकरण समारोपाच्या कार्यक्रमात कोलाजच्या रूपात दाखवण्यात आले.

या कार्यक्रमांना मेधा पाटकर, मुक्ता बर्वे, प्रतिभा मतकरी, दीपक राजाध्यक्ष, रामदास भटकळ, पंकज विष्णू, चिन्मय मांडलेकर, संदीप पाठक, विक्रम गायकवाड, नीरजा, विजयराज बोधनकर, राजू सुतार, राज असरोंडकर, मुक्ता श्रीवास्तव, अपर्णा भोळे, आदी नाट्य, चित्र, कला, साहित्य आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते. चित्रकला कार्यक्रमातून निवडक १२ चित्रे तसेच प्रकेत ठाकूर याने काढलेली मतकरींची चित्रे आणि मतकरींनी स्वतः नर्मदा आंदोलनावेळी नर्मदा घाटीत काढलेली चित्रे दाखवली. सई मोहिते, प्रतीक सावंत आणि नयन दंडवते यांनी केलेले अभिवाचन, सुनील दिवेकर, प्रवीण खैरालिया, लता देशमुख, प्रगती वीर, दीपक वाडेकर यांनी सादर केलेली अभिव्यक्ती, आम्ही अनम्यूट होणार ही ऑनलाइन शिक्षणावरील नाटिका, नर्मदा आंदोलनाच्या आदिवासी भाषेतील गीतावरील नृत्य, मिट्टी सत्याग्रहावरील नाटिका, मतकरी यांच्या बकासूर आणि लोककथा ७८ नाटकातील प्रवेश सादर करण्यात आले. त्याचबरोबर मतकरींचे अप्रकाशित गीत पेटवा मशाली सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले याने केले. संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास नाट्य-चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मतकरींना आदरांजली वाहिली. झूम मंचावर झालेला हा कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह करण्यात आला होता.

Web Title: Collage of selected programs based on various arts and social topics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.