शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

कुलाबा वेधशाळेचे वादळी वाऱ्यानंतर धोक्याचे इशारे, मच्छीमारांचे नुकसान

By धीरज परब | Updated: May 8, 2025 00:25 IST

Mira Road Rain Update: ६ मे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वादळी वारे झोडपून काढू लागल्यावर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने रात्री १० च्या सुमारास वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. आधीच इशारा न मिळाल्याने भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील मच्छीमारांची तारांबळ उडून मोठे नुकसान झाल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. 

मीरारोड - ६ मे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वादळी वारे झोडपून काढू लागल्यावर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने रात्री १० च्या सुमारास वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. आधीच इशारा न मिळाल्याने भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील मच्छीमारांची तारांबळ उडून मोठे नुकसान झाल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुटला. त्यामुळे समुद्र देखील खवळला.  मासेमारी हंगामाचा शेवटचा टप्पा असल्याने भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली आदी भागातील मासेमारी बोटी मोठ्या संख्येने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. मात्र अचानक आलेल्या ह्या वादळ व पावसा मुळे मच्छीमारांना बोटी माघारी घ्याव्या लागल्या आहेत. तर मासेमारीला जाण्यासाठी अनेक मच्छीमार नाखवांनी त्यांच्या बोटीत डिझेल, बर्फ, धान्य, खलाशी आदींची तयारी केली होती. मात्र वादळ - पाऊस ह्यामुळे मासेमारी करीत समुद्रात जाणे टाळावे लागले. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान झालेच पण वादळा मुळे त्यांची धावपळ उडाली. बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी लावण्या करता त्यांची तारांबळ उडाली.

वादळी वारा सुरु झाल्या नंतर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने ६ मे च्या रात्री १० वाजता महाराष्ट्र आणि गोवा सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. ६ ते ११ मे साठी जारी केलेल्या इशाऱ्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या समुद्री भागात  ७ मे रोजी वादळासह तुरळक व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

८ मे गुरुवार रोजीसाठी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटसह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर ९ ते ११ मे दरम्यान किनारपट्टी भागात हलका पाऊस वा कोरडे वातावरणची शक्यता वर्तवली आहे. वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा देणाऱ्या हवामान वेधशाळेच्या कारभारा बद्दल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस मुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना स्वतःचा आणि खलाश्यांच्या तसेच मासेमारी बोटीच्या सुरक्षितते साठी किनाऱ्याकडे धाव घ्यावी लागली. अनेक मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात जाण्या करता सर्व तयारी करून होते. मात्र त्यांचा बर्फ आदी वाया जाऊन नुकसान झाले आहे.  वेधशाळेने वेळीच इशारा दिला असता तर मच्छीमारांना आधीच खबरदारी घेता आली असती असे डिमेलो म्हणाले.

टॅग्स :RainपाऊसMira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे