शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

संशयातून प्रशिक्षकानेच केली कबड्डीपटू मुलीची हत्या, प्रशिक्षक अटकेत

By अजित मांडके | Updated: May 28, 2024 14:59 IST

कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. मृत १७ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती.

ठाणे : आपली प्रियेसी दुसºयाबरोबर बोलते या संशयावरुन एका १७ वर्षीय कबड्डीपटू मुलीची तिच्याच प्रशिक्षकाने गळा आवळून आणि गळ्याभोवती कात्रीने भोसकून हत्या केल्याची घटना कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (२३) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोलशेत येथे एका १७ वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा आवळून आणि कात्रीने गळ्याभोवती भोसकवून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर गणेश याचे त्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. मृत १७ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती.२४ मे या दिवशी तिच्या घरातून अचानक दुगंर्धी सुटली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती घर मालकाला दिली. घर मालकाने दरवाजा उघडला असता, घरामध्ये १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यावेळेस तिची आई आणि भाऊ घरात नव्हते.  त्यानंतर या संदर्भात कापुरबावडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेला. शव विच्छेदन अहवाल २५ मे रोजी प्राप्त झाला, त्यात तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळ्या भोवती जखमा झाल्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तिच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी तिची ओळख कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव याच्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गणेश याला नवी मुंबईतील घणसोली येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने संशयातून तिची हत्या केल्याची कबूली दिली. सोमवारी याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती. तिने गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. यातून त्यांची मैत्री झाली होती. गणेश तिच्यावर प्रेम करत होता. २३ मे या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी घरामध्ये एकटी असताना गणेश तिच्या घरी आला. ती इतर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते असा संशय गणेश याला होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला. त्यानंतर तिच्या गळ्या भोवती कात्रीने जखमा केल्या. हत्या झाल्यानंतर गणेशने बाहेरून दरवाजा ओढून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गणेश याला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस