शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

माझ्यातील एक गुण घ्यायचा असेल तर हा घ्या...; एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:12 IST

यापूर्वी एवढा मोठा मेळावा कधी झाला नाही, कारण तेव्हा पक्षात एकच युवा आहे असा समज होता, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

Shivsena Eknath Shinde ( Marathi News ) : युवासेनेचा 'युवा महाराष्ट्र' हा राज्यस्तरीय मेळावा काल शनिवारी ठाण्यातील रेमंड मैदानात पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबतची त्यांची भूमिका मांडली. तसंच माझ्यातील कोणता एक गुण तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्यातला कार्यकर्ता व्हा आणि कामाला लागा, असं आवाहन शिंदे यांनी उपस्थित युवासैनिकांना केलं.       युवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दिवस रात्र एक करून मी लोकांसाठी काम करत असतो. मी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझे 'एक्स' द्वारे कौतुक केले होते. मात्र माझ्यातील कोणता एक गुण तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्यातला कार्यकर्ता व्हा आणि कामाला लागा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री महारोजगार योजना, शासन आपल्या दारी यासारखे अनेक उपक्रम राबवल्यामुळे आपण थेट सर्वसामान्य लोकांशी जोडले गेलो आहोत. शासनाने दिवस रात्र एक करून अनेक निर्णय घेत असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहचवावेत यासाठी आपण सर्वांनी स्वतः मुख्यमंत्रीच आहोत असे समजून काम करायला हवं. लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा," असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंना टोला

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. "युवासेनेचा एवढा भव्य मेळावा पहिल्यांदाच होत असून ही आनंदाची बाब आहे. यापूर्वी एवढा मोठा मेळावा कधी झाला नाही कारण तेव्हा पक्षात एकच युवा आहे असा समज होता. मात्र आता हे चित्र बदलले आहे," असं ते म्हणाले. "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत यासाठी दीड वर्षांपूर्वी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मात्र गेल्या दीड वर्षात या सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावेत," अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर शिवरायांचा छावा या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणरा अभिनेता भूषण पाटील याचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सत्यम लिंगोळे या तरुणाला युवासेना मध्यवर्ती कार्यालयात नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल, दीपेश म्हात्रे, किरण साळी, अमेय घोले आणि राज्यभरातून आलेले युवासेना युवतीसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेAditya Thackreyआदित्य ठाकरे