शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रता निकाल, उबाठा गट, घराणेशाही अन् आव्हान; शिंदेंचा आज पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:39 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन गटांकडून परस्परांविरोधात दाखल केलेल्य विविध याचिकांवर आपला निकाल सुनावत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षच मूळ शिवसेना असल्याचं सांगितलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

कालच्या निर्णयानंतर अनेकांनी राज्यभर जल्लोष केला. सामान्य शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. लोकशाहीचा विजय झाला आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. दीड वर्षापासून जो विश्वास माझ्यावर ठेवला त्यांचे आभार, असं एकनाथ शिंदे म्हणाले. लोकशाहीत बहुमताला महत्व असते आणि लोकसभा, विधानसभा आणि संघटनेत आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे काल आमच्या बाजूने निकाल दिला. भरत गोगावले आमचे प्रतोद आहेत त्यावर देखील शिक्कामोर्तब झाला आहे. बाळासाहेबांचे विचार घेवून आम्ही सरकार स्थापन केले, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

भरत गोगावले यांची उबाठा गटाचे आमदार अपात्र करावे, ही याचिका अध्यक्षांनी फेटाळली याचे कारण आम्हाला माहिती नाही. विरोधी आमदारांच्या अपात्र संदर्भात आम्ही कायदेतज्ञांशी चर्चा करणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. उबाठा गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. निवडणूक एका बरोबर लढवायची आणि निवडून आल्यावर सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. बाळासाहेबांनी ज्या कॉंग्रेसचा विरोध केला, त्याच कॉंग्रेसच्या मांडीवर बसले, अशी टीका एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर केली. 

विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेले भाष्य खालच्या पातळींवरील आहे. स्वतःच मालक म्हणुन काहीही निर्णय घेता येणार नाही. उद्धव ठाकरे काल पत्रकारांवर उबाठा म्हटलं म्हणून संतापले. मात्र त्यांनी बाळासाहेबांच्याऐवजी स्वत:चे नाव पक्षासाठी मागितले. त्यामुळे त्यांना नेमकं काय पाहिजे हे समजले, असा निशाणा एकनाथ शिंदेंनी साधला. घराणेशाहीला ही चपराक आहे. जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा घटनेच्या आधारावर सर्व चालत होतं. नंतर मनमानी कारभार सुरु झाला, असा आरोपही एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. उद्धव ठाकरे उद्या कल्याण दौरा करणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचवावे, असं आव्हान देखील एकनाथ शिंदेंनी दिले. 

एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद-

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे