क्लस्टरचा मार्ग अखेर मोकळा

By Admin | Updated: September 8, 2015 23:31 IST2015-09-08T23:31:09+5:302015-09-08T23:31:09+5:30

क्लस्टर योजना ठाण्यात राबविल्यास वाढत्या लोकसंख्येला पुरेशा मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास महापालिका सक्षम असल्याचा इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल मंगळवारीमहापालिका

Cluster route finally frees | क्लस्टरचा मार्ग अखेर मोकळा

क्लस्टरचा मार्ग अखेर मोकळा

ठाणे : क्लस्टर योजना ठाण्यात राबविल्यास वाढत्या लोकसंख्येला पुरेशा मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास महापालिका सक्षम असल्याचा इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल मंगळवारीमहापालिका आयÞुक्त संजीव जयस्वाल यांनी राज्य सरकारला सादर केला. ठाण्यातील अनधिकृत किंवा अधिकृत धोकादायक इमारतींमधील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
क्लस्टर योजनेकडे ठाण्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच या विषयावर राष्ट्रवादीने मोर्चाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने हा अहवाल सादर केल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे. आयुक्तांनी क्रि सील या मान्यताप्राप्त सल्लागारांच्या मदतीने गेला दीड महिन्यात ‘इम्पॅक्ट असेसमेंट फॉर प्रपोज्ड क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्किम इन ठाणे सिटी’ हा अहवाल तयार केला आहे. त्यासाठी आठ ठिकाणच्या प्रस्तावित क्लस्टरचा अभ्यास केला आहे. यामध्ये क्लस्टरनंतरही महापालिका सर्व सुविधा देण्यात सक्षम असल्याचे म्हटले आहे. क्लस्टरनुसार सध्या वापरलेल्या एफएसआयच्या दुप्पट किंवा चार यापैकी जो जास्त असेल तेवढा एफएसआय या धोरणात दिला जाणार आहे. त्यामुळे नव्याने जे बांधकाम होईल, त्यातल्या जवळपास पन्नास टक्के घरामध्ये स्थानिक नागरिक राहणार आहेत. उरलेल्या काही घरांमध्ये शहरातील इतर भागातील रहिवाशी राहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरु न शहरात राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मर्यादीत राहणार आहे. रेंटल किंवा अफोर्डेबल हाऊसिंग योजनांमध्ये जवळपास शंभर टक्के नवी कुटुंब वास्तव्याला येतात. तसा प्रकार क्लस्टरमध्ये होणार नाही, असे मत महापालिकेने यावेळी नोंदविले.

शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांना श्रेय
ठाणे शहरातील अनेक अनेक अनधिकृत इमारती मोडकळीस आल्या आहेत. सध्याच्या नियमानुसार त्यांचा पुनर्विकास अशक्य आहे. त्यात शेकडो कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून त्यांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी क्लस्टर डेव्हल्पमेंट योजना जाहिर केली होती.
तिचा आराखडा तयार करताना पालिकेने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट पालिकेने तयार केला नसल्याचा आक्षेप नोंदवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल झाली होती. कोर्टानेही तो मुद्दा ग्राह्य ठरविल्यामुळे क्लस्टरचे भवितव्य धोक्यात येते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ठाण्यातील शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस केलेल्या कामामुळेच क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या निमित्ताने ठाणे महापालिकेला काही घरे उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Cluster route finally frees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.