शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

क्लस्टरला तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:41 AM

क्लस्टरचे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे ठरणार असून पहिल्या टप्प्यात वागळे इस्टेटच्या किसनगरनगर १ आणि दोन या भागांच्या विकासाला राज्य शासनाने तत्वत: मान्यता

ठाणे : गेली साडेतीन वर्षे कागदावर दाखविण्यात आलेले क्लस्टरचे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे ठरणार असून पहिल्या टप्प्यात वागळे इस्टेटच्या किसनगरनगर १ आणि दोन या भागांच्या विकासाला राज्य शासनाने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधववारी पत्रकार परिषदेत दिली.विशेष म्हणजे क्लस्टरमध्ये मिळणारे घर आता लीजऐवजी एसआरएच्या धर्तीवर मालकी हक्काचे घर मिळणार आहे. शिवाय स्थानिक रहिवाशांना एकत्र येऊनही ही योजना राबविता येणार असून किंवा तेही या योजनेसाठी विकासक शोध शकणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरांतील रस्ते,चौक मोठे आणि चकाचक होणार असून ठिकाणी उद्यानांची हिरवळही दिसणार आहे. या पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, आयुक्त संजीव जयस्वाल, सहाय्यक संचालक नगररचना देशमुख, शहर नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.>हाजुरी, लोकमान्यनगरालाही मिळणार न्यायकिसनगर पाठोपाठ हाजुरी भागाच्या क्लस्टरची मंजुरी ९९.५ टक्के झाली असून एक ते दोन दिवसात त्यालाही मंजुरी दिली जाणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच राबोडी आणि लोकमान्यनगरचेही क्लस्टर मंजूर केले जाणार आहे.>300चौरस फुटांचे घर मोफत मिळणारठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील क्लस्टरचे ४४ अर्बन रिन्युअल प्लान तयार केले असून त्यातील पहिल्या टप्यात किसनगर, लोकमान्यनगर, राबोडी, हाजुरी, टेकडी बंगला, कोपरी यांचा समावेश आहे.त्यातील आता किसनगर भागाच्या विकासाला तत्वत: मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी किसनगर १ मध्ये २२७६ घरे असून किसनगर २ (जय भवानीनगर) या ठिकाणी १५४० घरे आहेत.तर याचे क्षेत्रफळ हे १ लाख ४९ हजार ७०० स्केअर मीटर एवढे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या मध्ये रहिवाशांना ३०० चौरस फुटांचे घर मोफत मिळणार असून त्यापुढील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कन्स्ट्रक्शन टीडीआरनुसार पैसे द्यावे लागणार आहेत.>दहा लाख रहिवाशांना दिलासावागळे इस्टेट येथे अनधिकृत धोकादायक इमारतींमध्ये दहा लाखांहून अधिक नागरिक राहतात. या रहिवाशांना सुरक्षित असे स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून किसननगर, वागळे इस्टेट परिसरातील क्लस्टर अर्थात नागरी विकास समूह योजनेला मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.या योजनेमुळे किसननगर जयभवानीनगर एकमेकांना जोडले जाणार आहे. तसेच भोगवटादाराला १२.५० टक्के मोबदला तसेच मालकी हक्काचे घर मिळणार आहे. तसेच या योजनेमुळे परिसरातील रस्ते देखील रुंद होणार असून या ठिकाणी सुनियोजित पार्किंग, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, उद्योगकेंद्रदेखील असणार आहे. तसेच वाणिज्य व औद्योगिक भागातून रोजगारदेखील उपलब्ध होणार असल्याचेत्यांनी सांगितले.प्रायोगिक तत्वावर किसननगर, वागळे इस्टेट येथील राबविण्यात येणाऱ्या योजनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लोकमान्यनगर, राबोडी या बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेल्या ठिकाणी ती राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत, धोकादायक इमारती आहेत अशा हाजुरी, राबोडी, लोकमान्यनगर, विटावा, मुंब्रा या ठिकाणीदेखील ही योजना राबविणे सहज शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>देशातील सर्वात मोठा प्रकल्प - आयुक्तठाणेकरांसाठी आजचा हा दिवस अतिशय महत्वपूर्ण असा दिवस असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी राबविण्यात येणाºया योजनेचा आराखडा कसा असावा, प्रत्यक्ष किती जागा देण्यात यावी याचा सर्व अभ्यास महापालिका स्तरावर करण्यात आला आहे. तसेच किसननगर ही दाट वस्ती असून या ठिकाणी क्लस्टर राबविणे हे सर्वात मोठे आव्हान होते. या ठिकाणी राहत असलेल्या ६०० कुटुंबाच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करु न मगच नवीन बांधकाम करणे हे आव्हान होते, परंतु या गोष्टींचा सर्वंकष अभ्यास करण्यात बराच कालावधी गेल्याने या योजनेला विलंब झाल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. आजपर्यंत असा प्रकल्प कुठेही झाला नसून वसलेल्या शहराला बदलून नवीन शहर करणे हे ठाणे शहरात होत असून हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.>रस्ते होणार ४० मीटरचे : तसेच क्लस्टरमध्ये ६ मीटर ऐवजी ४० मीटरचे रस्ते येणार आहेत, रस्त्यांच्या सीमांकनामध्ये ६०० च्या सुमारास घरे असून या ६०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी एमएमआरडीएने भाडेतत्वावर घरे उपलब्ध करून देण्यासाठी मंजूरी दिली असून या रहिवाशांना स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.>विकासकाला इतर ठिकाणी मिळणार टीडीआरकिसनगरनगर भाग हा दाटीवाटीने वसला आहे. त्यामुळे येथे आधीच जास्तीचा एफएसआय वापरला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी उप भागाचा म्हणजेच किसनगरनगर २ चा समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी या ठिकाणी क्लस्टर योजना राबविणे आर्थिकदृष्टया व्यवहार्य नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आणखी एक उपभाग याठिकाणी एकत्र केला जाणार असून त्यानंतर विकासकाला या भागात जास्तीत जास्त चार एफएसआय वापरता येणार असून इतर जास्तीचा एफएसआय इतर ठिकाणी टीडीआर स्वरुपात वापरता येणार आहे. त्यामुळे हे अवघड शिवधनुष्य पेलवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>रहिवाशांना मिळणार मालकी हक्काचे घरएसआरए योजनेप्रमाणे या योजनेतही रहिवाशांना लीजवर नाही तर हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. शासनाने यास मान्यता दिली आहे. तर जागा ही लीजवर असणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.>स्थानिक करूशकणार विकासया योजनेत आता स्थानिक नागरिक एकत्र येऊन ते या ठिकाणाची योजना राबवू शकणार आहेत, किंवा तेसुद्धा एकत्र येऊन या योजनेसाठी विकासक आणू शकणार आहेत.