पालिका हेल्पलाइनला घणघण

By Admin | Updated: July 12, 2016 02:33 IST2016-07-12T02:33:48+5:302016-07-12T02:33:48+5:30

पाऊस असो किंवा नसो, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा दूरध्वनी वारंवार खणखणत असतो. मागील १०० दिवसांत महापालिकेच्या हेल्पलाइनवर तब्बल

Closer to municipal helpline | पालिका हेल्पलाइनला घणघण

पालिका हेल्पलाइनला घणघण

पंकज रोडेकर,  ठाणे
पाऊस असो किंवा नसो, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा दूरध्वनी वारंवार खणखणत असतो. मागील १०० दिवसांत महापालिकेच्या हेल्पलाइनवर तब्बल एक हजार एक दूरध्वनी आले. सर्वाधिक ५०० कॉल हे जूनमध्ये आले. या कॉलमध्ये आग आणि झाडे उन्मळून पडल्याचा घटना होत्या. त्याचबरोबर तीन बोगस कॉल होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात एखाद्यावेळी आपत्तीजनक परिस्थिती ओढवल्यास त्याला दोन हात करण्यात ठामपाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. तक्रारीसाठी काही हेल्पलाइन नंबर दिले आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. २४ तास सुरू असलेल्या कक्षाचा दूरध्वनी १०० दिवसांत जबरदस्त खणखणतोय. या हेल्पलाइनवर एक हजार एक कॉल आले आहेत. यामधील जवळपास ५५९ कॉल महापालिकेने तयार केलेल्या तक्रारीच्या टाइपमधील इतर तक्रारींमध्ये मोजण्यात आले आहे. आलेल्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी २० तक्रारींचे कॉलम तयार केले आहेत. यामध्ये आग, शॉर्टसर्किट, झाडे पडणे, फांदी तुटून पडणे, स्लॅब-प्लास्टर-घर-फुटपाथ, बिल्डिंग किंवा तिचा कॉलम, नाला, भिंत आदी पडणे. गॅसगळती, बोगस, मॉकड्रील असे कॉलम तयार केले आहेत.
पावसाळ्यात तक्रारींचा पाऊस
पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. जून महिन्यात तब्बल ४५९, जुलैमध्ये १३८ अशा विविध प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये जवळपास १५० झाडे उन्मळून पडली, तर पाणी तुंबण्याच्या ३९ तक्रारी आल्या आहेत. तीन ठिकाणी जमीन खचण्याच्या तक्रारी आल्या आहेत.
मे-एप्रिलमध्ये ५०० तक्रारी
मे आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांतही तक्रारींचा ओघ जास्त होता. मात्र, या दोन महिन्यांत इतर तक्रारी निम्म्यापेक्षा अधिकच होत्या. साधारणत: ३७० तक्रारी होत्या. परंतु, सर्वाधिक १०६ तक्रारी लहानमोठ्या आगीच्या नोंदवल्या आहेत. तर, ३० झाडे उन्मळून पडली आहेत.
या घटनेत एकच जीवितहानी
आतापर्यंत आलेल्या तक्रारींत काही प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पण, जीवितहानी एकाच ठिकाणी झाली आहे. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Closer to municipal helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.