हवामानातील बदल पिकांना घातक

By Admin | Updated: March 1, 2016 01:52 IST2016-03-01T01:52:28+5:302016-03-01T01:52:28+5:30

डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने

Climate change is dangerous to crops | हवामानातील बदल पिकांना घातक

हवामानातील बदल पिकांना घातक

बोर्डी : डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी व बागायतदारांना ग्रासले आहे. पंचायत समिती कृषी विभागात प्रतिबंधात्मक कीडनाशक औषधे तसेच फवारणी पंपाचा तुटवडा असल्याने महागडी औषध खरेदीमुळे बळीराजा हवालदिल बनला आहे.
डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षापासून नगदी पीके घेण्याचा कल वाढला आहे. सागरी आणि डोंगरी भागात वांगी, मिरची, तसेच कारली, दुधी, शिराळे या वेलवर्गीय पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारखाना, बांधकाम आणि वीटभट्टी मजुरही शेतीकडे वळले आहेत. मिरची पिकातून भरघोस आर्थिक लाभ होतो. परंतु ते किड व रोगांना लवकर बळी पडते. गेल्या पंधरा दिवसापासून दाट धुके, आणि वातावरणातील बदलाचा फटका भाजीपाला पिकांवर दिसू लागला आहे. भुरी, पांढरीमाशी, फुलकिडे, रसशोषक अळी इ. चा उपद्रव वाढल्याने पिक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.
आंबा, सफेद जांभू या बागायती मोहर धरू लागल्या आहेत. तालुक्यात जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. सफेद जांभूचे क्षेत्र त्यामुळे पिकांवर औषध फवारणी करण्याची गरज आहे. मात्र शेतकऱ्याकडे तेवढा पैसा नसल्याने आकाशाकडे पहावे लागत आहे.

मात्रच्डहाणू पंचायत समिती कृषी विभागाकडे ना औषधांना साठा आहे ना फवारणी साहीत्य त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी विक्रेत्यांकडून अधिक पैसे देऊन किटकनाशके खरेदी करावी लागतात. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे शासकीय अनास्थेपायी शेतकऱ्यांचा हकानाक बळी जात आहे.
च्जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. झाडांनी मोहर धरल्याने आणि दुसरीकडे पालवी फुटल्याने बागायतदारांचे गणित बिघडले आहे.

Web Title: Climate change is dangerous to crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.