कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वेचा मार्ग मोकळा; ठाणे रेल्वे स्थानकाचा भार कमी होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 02:00 AM2020-10-17T02:00:16+5:302020-10-17T02:00:39+5:30

सिडको देणार जागा, राजन विचारेंनी केली पाहणी

Clear the Kalwa-Airoli elevated railway line; The load of Thane railway station will be reduced | कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वेचा मार्ग मोकळा; ठाणे रेल्वे स्थानकाचा भार कमी होणार 

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वेचा मार्ग मोकळा; ठाणे रेल्वे स्थानकाचा भार कमी होणार 

googlenewsNext

नवी मुंबई : कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौरस मीटर जागा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय शुक्रवारी १६ आॅक्टोबर रोजी सिडकोने घेतला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील भार कमी करणाऱ्या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया दोन्ही प्राधिकरणांच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार आहे. सिडको कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीनंतर खासदार राजन विचारे यांनी दिघा स्थानकाच्या जागेची पाहणी केली.

कल्याण-डोंबिवलीमधून नवी मुंबईत येणाºया आणि नवी मुंबईतून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणाºया नागरिकांना ठाणे रेल्वे स्थानकात गाडी बदलावी लागू नये यासाठी कळवा-ऐरोली हा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गा$तील अडथळे दूर करण्यासाठी खासदार विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची नवी मुंबईत शुक्रवारी बैठक घेतली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमआयडीसी आणि राज्य सरकारने आपली जमीन रेल्वेकडे हस्तांतरित केली आहे. फक्त सिडकोची जमीन अद्याप हस्तांतरित झाली नाही. ही जमीन तातडीने हस्तांतरित करावी, अशी सूचना विचारे यांनी सिडकोच्या प्रशासनाला केल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी प्रशासनाला दिले.या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एमआरव्हीसीचे संचालक विजय नाथावत, एस.एस. खुराना, प्रकल्पाचे उपव्यवस्थापक एस.के. चौधरी, साहाय्यक अभियंता सी.पी. कुलदीप आदी उपस्थित होते.

डिसेंबर २०२१ पर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरू होणार
कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानक या दोन्ही प्रकल्पांमध्ये असलेले अडथळे दूर झाले आहेत. एलिव्हेटेड मार्गासाठी सिडकोच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्नही मार्गी लागला असून दिघा रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे.
- राजन विचारे, खासदार

Web Title: Clear the Kalwa-Airoli elevated railway line; The load of Thane railway station will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे