शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करणार स्वच्छतेबाबतची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 4:08 PM

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आता शालेय विद्यार्थ्यांचा आधार घेणार आहे. त्यानुसार हे विद्यार्थी किमान त्यांच्या घरच्यांना तरी स्वच्छतेबाबत जागरुक करतील हा मुळ उद्देश आहे.

ठळक मुद्देस्वच्छ शहर सर्व्हेक्षणाची पालिकेने सुरु केली तयारीमुख्याध्यापक शिक्षकांनाही घेणार सामावून

ठाणे - शाळेत शिकणारे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्याने त्यांच्याकडून आता काही कामे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार स्वच्छतेबाबतची जनजागृती आता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे. त्यानुसार शाळेतील मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना स्वच्छतेबाबतची संकल्पना स्पष्ट करुन पुढील धोरण ठरविले जाणार आहे.केंद्राच्या स्वच्छ शहर सर्व्हेक्षणाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने यंदा देखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सध्या ठाणे महापालिका स्वच्छतेबाबतीत खालच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा नंबर वाढविण्यासाठी पालिकेच्या वितीने विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता शहरातील शाळांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतची जनजागृती केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात महापालिका शाळांच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे. त्याची आखणी करण्याचे काम सुरु झाले आहे. यामध्ये महापालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा महापालिकेचा विचार आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत, त्यामुळेच त्यांनी किमान आपल्या घरच्यांना जरी स्वच्छतेबाबत कशा पध्दतीने काळजी घ्यावी एवढे जरी काम केले तरी त्यामुळे घरची मंडळी यामुळे जागृत होऊन स्वच्छतेबाबतची काळजी घेतील असा पालिकेचा उद्देश आहे. त्यानुसार पुढील महिन्यात पहिल्या अथवा दुसऱ्या  आठवड्यात या जनजागृतीस सुरवात होईल अशी अपेक्षा गृहीत धरण्यात आली आहे.विद्यार्थी दशेपासून त्यांना स्वच्छतेबाबत जर माहिती झाली तर भविष्यात याबाबत आणखी जागरुक होतील हा मुळ उद्देश आहे. त्यादृष्टीने आता विचार सुरु झाला आहे.(समीर उन्हाळे - अतिरिक्त आयुक्त, २ - ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त