तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु, तीन महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:50 PM2017-11-24T15:50:51+5:302017-11-24T15:56:33+5:30

किसनगर भागातील विजय निवास इमारतीच्या तिसऱ्या  मजल्याचा स्लॅब कोसळुन झालेल्या दुर्देवी घटनेत एका ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला असून, तीन महिला जखमी झाल्या आहेत.

60-year-old dies of slab collapse, third woman injured | तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु, तीन महिला जखमी

तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु, तीन महिला जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक इमारतीच्या यादीत होता समावेशतळ अधिक पाच मजल्याची इमारत२० वर्षे जुनी इमारत

ठाणे - किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिसऱ्या  मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या  मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका ६० वर्षीय वृध्दाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. तर या घटनेत तीन महिला देखील जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु या घटनेमुळे किसनगर भागातील इमारती पुन्हा रडावर आल्या आहेत.
रात्री १२.३० च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांचे व अग्निशमन दलाचे पथक, २ अ‍ॅम्ब्युलन्स, घटनास्थळी दाखल झाल्या. तळ अधिक पाच मजल्याच्या या इमारतीच्या तिसऱ्या  मजल्यावरील हॉल मधला स्लॅब हा दुसऱ्या  मजल्यावर पडल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे. त्यामुळे या दुर्देवी घटनेत दुसऱ्या  मजल्यावरील बबलू घोष (६०) यांचा जागीच मृत्यु झाला. तसेच बानी बबलू घोष (५६) या देखील जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यामुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर नयना पाठारे (५९) यांच्यासह यास्मीन रजनीकांत पठारे (२२) या देखील किरकोळ जख्मी झाल्या आहेत. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान ही इमारत २० वर्षे जुनी असून ती धोकादायक इमारतींच्या यादीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या इमारतीमध्ये ३८ कुटुंबांचे वास्तव्य असून घटना घडल्यानंतर काहींनी बाजूच्या इमारतीचा आसरा घेतला आहे. तर पालिकेने देखील येथील रहिवाशांना हलविले आहे. या इमारतीत ओव्हरलोड झाल्यानेच हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. त्यानुसार ही इमारत वापरण्यास योग्य आहे अथवा नाही, याची माहिती घेण्यासाठी पालिकेची स्ट्रक्चरल आॅडीटची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून या इमारतीचा सर्व्हे सुरु झाला आहे. या आॅडीटचा अहवाल दोन दिवसात पालिकेला प्राप्त होणार असून त्यानंतर या इमारतीचे भवितव्य ठरविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु या दुर्देवी घटनेनंतर किसनगर हा परिसर पुन्हा एकदा रडारवर आला आहे.


 

Web Title: 60-year-old dies of slab collapse, third woman injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.