शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

नगरसेवकांना क्लीन चिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:21 AM

उपमहापौरांचा जावईशोध; फेरीवाल्यांकडून हप्ते घेत नसल्याचा निर्वाळा

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत फेरीवाले उदंड झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी नुकतीच सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलवली होती. त्यात फेरीवाल्यांकडून काही लोकप्रतिनिधी रक्कम वसूल करत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता नगरसेवक फेरीवाल्यांकडून हप्ते घेत नसल्याचा निर्वाळा देत उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी त्यांना क्लीन चीट दिल्याने अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.गल्लीबोळांत फेरीवाले आपले बस्तान मांडून वाहतूक व पादचाºयांची कोंडी करत असल्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित होउन तक्रारीही करण्यात आल्या आहेत. अनेक महासभांतही त्यावर चर्चा झडल्या.परंतु, तात्पुरत्या कारवाईखेरीज प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. तर काही नगरसेवक या कारवाईच्या अनुषंगाने अधिकाºयांवर आसूड ओढून आपली समाजाभिमुख कार्यतत्परता दाखवून देतात. मात्र बहुतांश नगरसेवक फेरीवाल्यांकडून सर्रास हप्ते गोळा करत असल्याचे फेरीवाला संघटनांच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. हे हप्ते ते स्वत: गोळा न करता भ्रष्ट अधिकाºयांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेला वसूल करतात.हप्ता मिळण्यास विलंब झाला की ते सतत त्या अधिकाºयांच्यामागे तगादा लावतात. त्यातच बाजार कर वसूल करणारे कंत्राटदार अधिक कर गोळा करण्याच्या हव्यासापायी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ करून प्रशासनाचा नव्हे तर आपली झोळी भरतात. या व अशा अनेक गुंतागुंतीच्या फेºयात अडकलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईचा आढावा घेण्यासह त्यावरील कारवाई व सूचना करण्यासाठी महापौरांनी बैठक बोलवली होती.तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत सर्व नगरसेवकांना प्रभागाच्या क्रमवारीनुसार आपल्या तक्रारी, सूचना व म्हणणे मांडण्याची संधी दिली. यात हप्तेखोर नगरसेवकांचाही समावेश होता. त्यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास अधिकारीच टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला.कारवाईनंतर साहित्य जप्त केल्यास हप्तेखोर नगरसेवक अधिकाºयांना फोन करून साहित्य परत देण्यास सांगतात, असे एका अधिकाºयाने सांगितले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.नगरसेवकच पुरवतात भाड्याने गाड्याभाजपाच्या नगरसेविका प्रभात पाटील यांनी तर फेरीवाल्यांना नगरसेवक व काही राजकीय मंडळींकडून भाडेतत्वावर हातगाडी पुरवली जात असल्याचा गौप्यस्फोट सभागृहात केला. या हातगाडींना विशिष्ट रंग देऊन त्याचे मासिक भाडे वसूल केले जाते. अशा हातगाड्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले जातात. त्यामुळेच फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची माहिती त्यांनी दिली.पालिका आयुक्तांनी व्यक्त केली सामूहिक कारवाईची गरजआयुक्त बालाजी खतगावकर यांनी फेरीवाल्यांवरील कारवाई केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता ती लोकप्रतिनिधींच्या सहभागाने सामूहिक होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांनी केलेल्या सूचनेनूसार कारवाईचा आढावा घेऊन प्रसंगी फेरीवाला संघटनांचे म्हणणेही ऐकून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :hawkersफेरीवालेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक