शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

२५ नोव्हेंबरपासून क्लासेस सुरू करणार, कारवाई केल्यास 'जेल भरो' आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 15:50 IST

Classes : आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकरणीची महत्वाची बैठक पार पडली.

ठळक मुद्देकाही दिवसापूर्वीच २३ नोव्हेंबर पासून ९वी ते १२ वर्ग सुरु करण्याचे शासनाने सांगितले. परंतु खासगी क्लासेसबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ठाणे : अनलॉक मध्ये कोचिंग क्लासेस , शैक्षणिक संस्था वगळता दारूची दुकाने, बार, जिमखाने, ग्रंथालय, इतर सर्व गोष्टी सुरु झाल्या. परंतु शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती, नियमावली व आराखडा नाही. मुळात सरकार याबाबतीत उदासीन असल्याचेच दिसते. त्यामुळे आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकरणीची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत येत्या २३ तारखेला शाळा सुरु झाल्यानंतर २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचा ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई, क्लासेस बंद करण्याच्या सूचना किंवा दंड आकारणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोचिंग क्लासेसच्या वतीने महाराष्ट्रभर 'जेल भरो' आंदोलन  करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा मोठा गंभीर प्रश्न निंर्माण झाला असून, क्लास संचालकास मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.  शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती नियमावली व आराखडा नाही. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यासारख्या महामानवांनी जगाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्या महाराष्ट्रात शिक्षणाचे असे हाल होत असतील तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

 काही दिवसापूर्वीच २३ नोव्हेंबर पासून ९वी ते १२ वर्ग सुरु करण्याचे शासनाने सांगितले. परंतु खासगी क्लासेसबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही.  संघटनेच्य‍ा आजच्या बैठकीत  २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचे ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची  कायदेशीर कारवाई केली तर महाराष्ट्रभर 'जेल भरो' आंदोलन करण्याचा ठराव देखील सादर बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस