येऊर येथे हॉटेलात ग्राहकांना मारहाण

By Admin | Updated: June 13, 2017 01:25 IST2017-06-13T01:25:12+5:302017-06-13T01:25:12+5:30

किरकोळ वादातून मुंबईतील काही ग्राहकांना रविवारी येऊर येथील एका हॉटेलमधील कामगारांनी खुर्च्या व बांबूंनीमारहाण केली. वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी

Clash with customers at the EMER Hotel | येऊर येथे हॉटेलात ग्राहकांना मारहाण

येऊर येथे हॉटेलात ग्राहकांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : किरकोळ वादातून मुंबईतील काही ग्राहकांना रविवारी येऊर येथील एका हॉटेलमधील कामगारांनी खुर्च्या व बांबूंनीमारहाण केली. वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी कपिल जाधव, चिंटू पासवान आणि मनीष पासवान या तिघांना अटक केली आहे.
मुंबईतील मुलुंड कॉलनी येथील हायलॅण्ड पार्कचे रहिवासी संजोत रंजित सिंह रविवारी त्यांच्या सात मित्रांसोबत येऊर येथील बॉम्बे डक हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर संजोत यांनी वेटरकडे थम्स अप मागितले. बराच वेळ ते न मिळाल्याने संजोत आणि त्यांचे मित्र हॉटेलच्या काउंटरवर चौकशीसाठी गेले. या वेळी त्यांनी फ्रीजला हात लावल्याचा आरोप करून कर्मचाऱ्याने त्यांच्याशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे वाद वाढून वेटर्स व इतर १० ते १२ कर्मचाऱ्यांनी संजोत सिंह आणि त्यांच्या मित्रांना मारहाण सुरू केली. यात संजोत यांच्या नाकाचे हाड मोडले.

Web Title: Clash with customers at the EMER Hotel