उल्हासनगरात रिक्षाचालकांत हाणामारी, एकाचे पडले दात
By सदानंद नाईक | Updated: August 8, 2023 19:43 IST2023-08-08T19:43:35+5:302023-08-08T19:43:50+5:30
पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात रिक्षाचालकांत हाणामारी, एकाचे पडले दात
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील १७ सेक्शन चौकातील दोन रिक्षाचालकात सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रवासी घेण्यावरून हाणामारी झाली. यामध्ये एकाचे दात पडले असून दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात परस्परा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, १७ सेक्शन चौकात रिक्षाचालक अमित बापू दाभाडे व पवन किशोर पवार हे सोमवारी सायंकाळी ६ वाजता चौकात रिक्षा घेऊन उभे होते. रिक्षा लाईन मध्ये नसतांना प्रवासी घेण्यावरून दोघात शिवीगाळ व तू तू मैं मैं होऊन प्रकरण हाणामारीवर गेले. हाणामारीत पवन पवार यांचे दोन दात पडले असून अमित दाभाडे हाही जखमी झाला आहे. दोघांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.