रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भालेराव डॉक्टरेट,
By सदानंद नाईक | Updated: April 10, 2023 18:16 IST2023-04-10T18:16:44+5:302023-04-10T18:16:53+5:30
आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपल्याला सन्मानित केले असून यामुळे सामाजिक जबाबदारी अधिक वाढल्याची प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली.

रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भालेराव डॉक्टरेट,
उल्हासनगर : रिपाइं आठवले गटाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांना समाजसेवेसाठी केंद्रीय ख्रिश्चन विद्यापीठ मलावी सरकारद्वारे डॉक्टरेट पदवी देऊन शनिवारी नवीमुंबई येथे सन्मानित केले. आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपल्याला सन्मानित केले असून यामुळे सामाजिक जबाबदारी अधिक वाढल्याची प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेचे माजी उपमहापौर व रिपाइं आठवले गटाचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट मानद पदवीने शनिवारी नवी मुंबई केंद्रीय ख्रिश्चन विद्यापीठ मलावी (साऊथ आफ्रिका) सरकार द्वारे सन्मानित केले.
मलावी प्रजासत्ताक मध्ये ८४ च्या अधिनियम क्रमांक १९, कलम १५ अंतर्गत नोंदणीकृत मानद डॉक्टरेट पुरस्कार सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीच्या सिनेटर्स अॅकॅडेमिशियन्सच्या अधिकारानुसार, नामांकन धारण करून आणि तेथील विशिष्ठ आणि अभिमुख सेवेसह विद्वत्तापूर्ण कामगिरीची मान्यता म्हणून देण्यात आली. भालेराव यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याने, त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे