हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:25+5:302021-04-01T04:41:25+5:30

मुरबाड : मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ...

Citizens have to pipe for a pot of water | हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट

हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट

मुरबाड : मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ठिकाणी जलकुंभ, उघड्यावर जलवाहिन्या, दारात नळ असूनही पाण्याची बोंब. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात एखाद्या हातपंपाला पाणी असेल तर तिथेच साऱ्या गावाची झुंबड उडते.

उन्हाळा जस-जसा वाढत जातो तस-तशी भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे पाण्याचे साठेही तळ गाठायला लागतात. पूर्वी ज्या गावात बारमाही पाण्याची सोय आहे अशा गावातच मुली दिल्या जात असत. ज्या गावात नेहमीच पाणीटंचाई त्या गावात मुलगी दिली जात नव्हती. नंतर तिला पाणी भरण्याचा त्रास हा सहन करावा लागणार. हीच परिस्थिती वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागते.

मुरबाड तालुक्यातील पाटगाव, खोपीवली, घागुर्ली, मेर्दी, म्हाडस, सासणे. केवारवाडी, करचोंडे, तळेगांव, बाटलीची, साजई, फांगवाडी, खांड्याचीवाडी, वाघावाडी (पेंढरी), लोत्याची वाडी या गावात आणि आदिवासी पाड्यात आजही ही परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डिसेंबरपासून तेथील नागरिक हे प्रशासनाकडे टँकरची मागणी करतात. मात्र, कागदी घोडे नाचविणारे प्रशासन मार्च महिन्याची दाहकता वाढत असतानाही वास्तव जाणून घेण्यासाठी चालढकल करत आहेत.

---------------------------

तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकडून टँकरच्या मागणीचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना एक एप्रिलपासून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

- अमोल कदम, तहसीलदार.

तालुक्यातील २१ गावे व ३२ पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असली त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

राधेश्याम आडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Citizens have to pipe for a pot of water