शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:27 IST

ठाणे : नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबविणाºया अफरोज शेख (२६) या चोरट्याला मात्र नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केला आहे.कळव्याच्या भास्करनगर भागात राहणारा हा अफरोज याने ...

ठाणे : नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबविणाºया अफरोज शेख (२६) या चोरट्याला मात्र नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केला आहे.कळव्याच्या भास्करनगर भागात राहणारा हा अफरोज याने ८ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा. च्या सुमारास चरईच्या काबाडआळीतील आनंदवन या इमारतीच्या तळमजल्यावरील अ‍ॅड. स्वाती प्रधान-चिटणीस यांच्या कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून साथीदारासह आत शिरकाव केला. तो या कार्यालयाचे लॅच तोडत असतांनाच इतारतीमधील एका रहिवाशाने ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षासह इमारतीमधील इतर रहिवाशांनाही फोनवरून ही माहिती दिली. योगायोगाने या इमारतीच्या जवळूनच नौपाडा पोलिसांच्या गस्तीची मोबाईल व्हॅन जात होती. नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे माहिती मिळताच उपनिरीक्षक शिरीष यादव यांचे पथकही अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये पोहचले. तोपर्यंत तिथे जमा झालेल्या नागरिकांनी अफरोजला लॅपटॉपसह पकडले. मात्र, या धुमश्चक्रीत त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप तसेच कटर, वायर कटर, कटावणी, रिंग पाना आणि इतर चोरी करण्यासाठीची सामुग्री हस्तगत केली. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. तर अन्य एका घटनेत सनमीत राजेभोसले यांच्या कॅन्डी किसेस, जीवन तारा, शॉप क्रमांक ६, विष्णुनगर येथील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ३ हजार ३२० ची रोकड तसेच लॅपटॉप असा २३ हजार ३२० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना ८ आॅक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे या तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा