रानमांजराचा वावर वाढल्याने दिव्यातील नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:34+5:302021-07-27T04:41:34+5:30
मुंब्रा : दिव्यातील आगासन भागातील राकेश मुंडे यांच्या घराच्या परिसरात रानमांजराचा वावर वाढला असून, सहा दिवसांमध्ये (२० ते २५ ...

रानमांजराचा वावर वाढल्याने दिव्यातील नागरिक भयभीत
मुंब्रा : दिव्यातील आगासन भागातील राकेश मुंडे यांच्या घराच्या परिसरात रानमांजराचा वावर वाढला असून, सहा दिवसांमध्ये (२० ते २५ जुलै) ते दोन वेळा रात्री मोकळ्या परिसरात मुक्तपणे वावरताना घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे. त्याचा वावर सुरू झाल्यापासून मुंडे यांच्या चार मांजरींची पिल्ले गायब झाली असल्यामुळे ती रानमांजरानेच फस्त केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रानमांजराच्या या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. मुंडे यांनी ही बाब वनविभाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी पिंजरे लावून त्याला पकडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुंडे यांनी ‘लोकमत’ला दिली.