नागरिकांनी चोराला शिताफीने पकडले

By Admin | Updated: November 14, 2016 04:13 IST2016-11-14T04:13:19+5:302016-11-14T04:13:19+5:30

चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या इमरान खान (२६, रा. अमृतनगर, मुंब्रा) या चोराला नागरिकांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना

The citizens caught the thief sharply | नागरिकांनी चोराला शिताफीने पकडले

नागरिकांनी चोराला शिताफीने पकडले

मुंब्रा : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या इमरान खान (२६, रा. अमृतनगर, मुंब्रा) या चोराला नागरिकांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठामपाच्या परिवहन सेवेत वाहक म्हणून काम करणाऱ्या तसेच मुंब्रा स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील विठ्ठल रखुमाई इमारतीच्या तळ मजल्यावरील रूममध्ये राहणाऱ्या मिलिंद देवरूखकर यांच्या कुटुंबातील सदस्य दिवाळीनिमित्त मुंबईतील त्याच्या नातेवाइकाकडे गेले होते. त्यामुळे तो त्याच्या मित्राच्या घरी गेला होते. तेथून पहाटे ५ वाजता तो घरी आला परत असता त्याला त्याच्या घरची कडी तुटली असून घरांमध्ये संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे जाणवले. त्याने त्वरित घराला बाहेरून कडी लावली. त्याच्या इतर मित्राच्या मदतीने पोलिसांना बोलवून चोराला त्यांच्या ताब्यात दिले.
पोलीस आल्यानंतर पळण्याचा प्रयत्न करणारा खान जमिनीवर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. देवरुखकर यांनी धाडस तसेच प्रसंगावधान राखून चोराला ज्या पद्धतीने पकडून दिले, त्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The citizens caught the thief sharply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.