शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर दलाल सक्रिय, नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपाने नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:08 IST

कोरोनाचा कोप वाढत असताना दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढतेय; परंतु लसीचा पुरवठाच होत नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेने केवळ ३ केंद्रेच सुरू ठेवली आहेत.

मीरा रोड : लसींच्या तुटवड्यामुळे मोजकीच लसीकरण केंद्रे सुरू असून, सर्वसामान्य नागरिक ऑनलाइन नंबर लागत नसल्याने हवालदिल झाले आहेत. नंबर लागला तरी त्यातसुद्धा वशिलेबाजी सुरू आहे. काही नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण केंद्रातील कर्मचारी आणि नागरिकसुद्धा त्रासले असून, फ्रंटलाइन वर्करच्या आड बोगस लसीकरण सुरू असल्याचे आरोप वाढले आहेत.कोरोनाचा कोप वाढत असताना दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढतेय; परंतु लसीचा पुरवठाच होत नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेने केवळ ३ केंद्रेच सुरू ठेवली आहेत. त्यातही भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी, तर नाझरेथ शाळा आणि हैदरी चौकातील पालिका सभागृहात ४५ वर्षांवरील नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जात आहे.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ ऑनलाइन नोंदणीद्वारे होत असले तरी नोंदणी करताना लसीकरणाची वेळ मिळत नाही. पालिका मात्र ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांची नोंद केवळ सायंकाळी ५ ते ७ या वेळेत घेत असल्याने याची माहिती असणारे त्या वेळेतच नोंदणी करून स्वतःचा नंबर लावून घेत असल्याचे सांगितले जात आहे.केंद्राबाहेर उभ्या असणाऱ्या पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षक आणि लसीकरण कर्मचाऱ्यांना न जुमानता पालिकेचे ओळखपत्र दाखवून किंवा नगरसेवकाने सांगितले आहे, पोलीस आहोत असे सांगून लोक आत शिरतात. काही नगरसेवक लसीकरण केंद्रात वावरताना व हस्तक्षेप करतानाही दिसतात. आतमध्येसुद्धा ओळखीचे किंवा वशिला लावून लसीकरण केले जाते. यामुळे वशिला नसलेल्या नागरिकांना बाहेर रांगेत तसेच आत केंद्रातसुद्धा काही तास ताटकळत बसून राहावे लागते.काही नगरसेवक, राजकारणी, पोलीस आदींचा हस्तक्षेप लसीकरण केंद्रांवर त्रासदायक ठरत आहे. वशिलेबाजी आणि हस्तक्षेपामुळे कर्मचारी वर्ग त्रासला आहे; पण विरोध केला तर कामावर त्रास देतील म्हणून  गप्प बसून त्यांना हे प्रकार सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवले.  महापालिकेने लसीकरण केंद्रात सीसीटीव्ही लावावेत आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासह हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.याप्रकरणी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपल्याकडेसुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी आल्या असून लसीकरण केंद्रात हस्तक्षेप, वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही. शहरातील नागरिकांना त्यांच्या नोंदणी क्रमानुसार लस मिळाली पाहिजे. त्यात भेदभाव, वशिलेबाजी कोणी करू नये. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.

फ्रंटलाइन वर्करच्या आडून लसीकरण- फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरणासाठी पालिकेने अर्ज नमुना ठेवला असला तरी सर्रास बोगस लोकांना तसे दाखले वा पत्र आदी देऊन फ्रंटलाइन वर्करच्या आड लसीकरण करून दिले जात आहे. फ्रंटलाइन वर्करना ऑनलाइन लसीकरण नोंदीची गरज नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. पालिका अशांना टोकन देऊन लसीकरण करत आहे. - त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर म्हणून लस घेतलेल्यांची सखोल चौकशी करण्यासह त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी व खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर