शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:08 IST

प्राधिकरण अपयशी; चिखलोलीतून सहा दशलक्ष लीटर पुरवठा बंद

अंबरनाथ : जीवन प्राधिकरणाने येथील चिखलोली धरणातून पाणी उचलणे बंद केल्याने त्याचा थेट फटका हा अंबरनाथ शहराला बसत आहे. थेट सहा दशलक्ष लीटर पाणी कमी झाल्याने प्राधिकरणाने एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ पूर्व भागाला वळविले आहे. त्यामुळे पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे चिखलोलीतून जो पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्या प्रमाणात एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळत नसल्याने पूर्व भागालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणी दूषित असल्याचे कारण पुढे करत प्राधिकरणाने धरणातून होणारा सहा दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा बंद केला. या धरणातून नवरेनगर आणि महालक्ष्मीनगर परिसरापर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्यावर या धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसीकडून अतिरीक्त सहा दशलक्ष लीटर पाणी घेणे गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी हे वाढीव पाणी देण्यास तयार नसल्याने आता उपलब्ध पाण्यावरच सर्व शहराची तहान भागविण्याचे काम प्राधिकरणाला करावे लागत आहे. मात्र, ते करत असताना शहराच्या दोन्ही भागांना मुबलक पाणी देण्यात प्राधिकरण सक्षम नाही. पश्चिम भागाला जो पुरवठा केला जात आहे, त्यातील दोन ते तीन दशलक्ष लीटर पाणी थेट पूर्व भागाला वळविण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.चिखलोली धरणाच्या पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यात प्राधिकरण सक्षमपणे काम करत नाही, तर दुसरीकडे एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी राजकीय प्रभाव पाडण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. वाढीव पाणी मिळत नसल्याने आता जावसई, फुलेनगर, कमलाकरनगर, कोहोजगांव, नालंदानगर, नारायणनगर या भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाकडे मुबलक पाणी नसल्याने प्राधिकरणाचे अधिकारीही हातवर करत आहेत. त्यामुळे या पाण्याच्या समस्येबाबत कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न पडला आहे.पाण्याचे नियोजन करण्यात प्राधिकरणाला अपयश आले आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी पाणी वळविण्याचे काम करीत आहेत. एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, तेच काम केले जात नाही.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याची समस्या ही आजची नाही. जीवन प्राधिकरणाने पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. पाणीपुरवठा वळविण्यात आल्याने पश्चिम भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.     - चरण रसाळ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई