शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिडको भूखंडवाटपाच्या चौकशीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:09 IST

सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

- नारायण जाधव ठाणे : कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या सिडकोच्या २४ एकर भूखंडातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरित नगरविकास विभागाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर जे. रोही यांची चौकशी समिती नियुक्त केली खरी; परंतु ही समिती सिडकोतील सर्व २०० प्रकरणांची नव्हे, तर १५ वर्षांत केवळ कोयना प्रकल्पग्रस्तांना केलेल्या भूखंडवाटप आणि भूखंड हस्तांतरणाचीच चौकशी करणार असल्याने सिडको अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.कोयना प्रकल्पग्रस्तांना रायगड जिल्हाधिकाºयांनी ओवे येथे २४ एकर भूखंडाचे वाटप करून त्याचे खासगी विकासकांना केलेल्या हस्तांतरणामुळे सिडकोचे १७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँगे्रसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमून तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले आहे.सिडकोने गेल्या १५ वर्षांत सर्वच प्रकल्पग्रस्तांना केलेल्या भूखंडवाटपाची आणि अशा भूखंडांच्या खासगी विकासकांना केलेल्या हस्तांतरणाची चौकशी झाली असती, तर अनेक गैरव्यवहार उघड झाले असते. परंतु, सिडकोतील २०० भूखंडवाटपाच्या चौकशीला बगल देऊन ओवेसह केवळ कोयना प्रकल्पग्रस्तांनाच गेल्या १५ वर्षांत केलेल्या भूखंडवाटपाची चौकशी करण्यास सांगून त्याबाबतची कार्यकक्षा नगरविकास विभागाने न्या. रोही यांना ठरवून दिली आहे.साडेबारा टक्के भूखंडवाटपात अनेक गैरव्यवहारमुख्यमंत्र्यांनी सिडकोतील २०० भूखंडवाटपाच्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे सूतोवाच करताच सिडकोसह नगरविकास खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाºयांचे धाबे दणाणले होते. कारण खारलॅण्ड, ट्रस्टच्या जमिनी, ज्या जमिनीला कोणी वारस नाही, निर्वासितांची जमीन अशा अनेक प्रकरणांत सिडको अधिकाºयांनी साडेबारा टक्के योजनेचे भूखंडवाटप करून ते बिल्डरांना हस्तांतरित केल्याची अनेक प्रकरणे आहेत. त्यांची चौकशी झाली असती, तर कोट्यवधींचे भूखंड घोटाळे उघड होऊन अनेक अधिकारी अडचणीत येण्याची भीती होती. अशाच प्रकारे वाघिवली येथील एका भूखंडाचे इराइसा डेव्हलपर्सना केलेल्या हस्तांतरण आणि भूखंडवाटपास नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे.अशी होणार चौकशीरोही समितीने ओवे सर्व्हे क्रमांक ८३ मधील २४ एकर जमीन शासन वा सिडको वा अन्य कुणाच्या मालकीची होती, जिल्हाधिकारी रायगड हे प्रचलित नियम, कायद्यानुसार या जमिनीचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यास सक्षम आहेत काय, या जमिनीचे वाटप केल्यानंतर तिचे हस्तांतरण अनुज्ञेय आहे काय, ते प्रचलित कायदे, नियम, शासनाच्या धोरणानुसार विधीग्राह्य आहे किंवा नाही, या जमिनीचा वापर वाटपपत्रानुसार कशासाठी आहे, इतर वापर अनुज्ञेय आहे का, याची चौकशी करावयाची आहे. याशिवाय, गेल्या १५ वर्षांत कोयना प्रकल्पग्रस्तांना केलेल्या भूखंडवाटपात विहित कार्यपद्धतीचे पालन झाले किंवा नाही, अशा प्रकारे जमिनीवाटप करताना त्यासाठीच्या निकषांचे पालन केले आहे काय, अपात्र व्यक्तींना भूखंडांचे वाटप झाले काय, अशा भूखंडवाटपाचे हस्तांतरण झाले आहे. काय, ते विधीग्राह्य आहे काय, याची चौकशी रोही समितीने करावयाची आहे.

टॅग्स :cidcoसिडकोthaneठाणे