शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलीस ठाण्यात झालेल्या 'त्या' मृत्यू प्रकरणाचा तपास CID करणार

By जितेंद्र कालेकर | Updated: October 7, 2022 18:32 IST

रेल्वे पोलीस ठाण्यात झालेल्या मृत्यूप्रकरणाचा तपास  सीआयडी करणार आहे. 

ठाणे : एका २५ वर्षीय तरुणीचा गेल्या एक महिनाभरापासून पाठलाग करणाऱ्या 59 वर्षीय राजेश भावसार या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात घडली. पोलिसांनी चौकशी करण्यापूर्वीच धसक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून केला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. कल्याण येथे राहणारी एक तरुणी पनवेल येथे नोकरीला आहे. त्यामुळे ती दररोज कल्याण ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल असा प्रवास करते. कल्याणमध्येच राहणारा भावसार हा बेलापूर येथे एका एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्यामुळे तोही सकाळी या मुलीच्या मागावर असायचा. ही आपबिती पीडित तरुणीने आपल्या आईला सांगितली. 

तेव्हा ६ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ती ठाण्यातून पनवेलकडे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जात होती. त्यावेळी तिची आई देखील सोबत होती. त्यावेळी तो ठाणे रेल्वे स्थानकातील पायऱ्या उतरतांना या मुलीने पाहिले. तेव्हा तिने आईच्या निदर्शनास आणले. त्यांना पाहून तो तिथून पळत असतांना त्यांनी त्याला ठाणे रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेल्या पुलावर गाठले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत त्याला नेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा हा विनयभंगाचा प्रकार असून तो रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित असल्याचे त्यांनी या मायलेकिंना सांगितले. आरपीएफच्या जवानांनी त्याला ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आणले. तिथे एकीकडे त्या तरुणीची तक्रार घेतली जात होती. त्यामुळे त्याची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच तो काही वेळातच खाली कोसळला. त्याला तातडीने रल्वे पोलिसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. 

पोलीस ठाण्यातील मृत्यूमुळे सीआयडी करणार तपासपोलीस ठाण्यात भावसार याला आणले गेल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. असे असले तरी नियमाप्रमाणे पोलीस ठाण्यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) बेलापूर येथील पथकाकडून केला जाणार आहे. शुक्रवारी हे प्रकरण ठाणे रेल्वे पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. त्याचवेळी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीच्या तपासणीबरोबर पोलीस अंमलदारांचीही चौकशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस