शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जमावाच्या मारहाणीत चोराचा मृत्यू, आणखी तिघांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 19:09 IST

जमावाच्या मारहाणीत शत्रुघ्न यादव (२२) या चोरटयाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असली तरी आणखी तीन ते चार जणांचा शोध घेण्यात येत आहे.

ठाणे: जमावाच्या मारहाणीत शत्रुघ्न यादव (२२) या चोरटयाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असली तरी आणखी तीन ते चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्यक्ष साक्षीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोमवारी (२० नोव्हेंबर रोजी) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास शत्रुघ्नला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला राजेंद्र यादवसह अनेकांनी बेदम चोप दिला. पहाटे २ ते ६ वाजण्याच्या दरम्यान त्या परिसरात ज्याला समजेल त्याने त्याची यथेच्छ धुलाई केली. याच दरम्यान, त्याला बांधून उलटे टांगण्यात आले. त्याानंतर बांबूने आणि लाथाबुक्यांनी ब-याच जणांनी त्याच्यावर हात साफ केला. जवळपास दोन ते तीन तास त्याची यथेच्छ धुलाई केल्यानंतर त्याची हालचाल बंद झाल्यावर सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यापैकी एकाने पोलिसांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण, फोन न लागल्यामुळे पुन्हा त्याला मारहाण केली. अखेर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा कळवा पोलिसांना कळविल्यानंतर त्याला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या घरात त्याने शिरुन चोरीचा प्रयत्न केला, त्या घरातील राजेंद्र यादव त्याचे वडील गगनप्रसाद यादव बाजूच्या घरातील पंचलाल यादव आणि जयहिंद उपाध्याय या चौघांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. यात आणखी किमान सात ते आठ जण असण्याची शक्यता असून त्यातील दोघांची नावे तपासात समोर आली आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नेमकी मारेकरी मिळण्यासाठी अनेक साक्षीदार तपासले जात असून पुरावेही गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ ला सांगितले.

 

टॅग्स :Crimeगुन्हा